एक्स्प्लोर

Chandrakant Patil : 'राज्यातील घटना चिंताजनक, दोषींना कठोर शिक्षा केली जाईल' : चंद्रकांत पाटील

Jalgaon News : विरोधकांनी टीका करणे हे त्यांचं कामच आहे. परंतु घडणाऱ्या घटना या चिंताजनक आहेत. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर शिक्षा केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Chandrakant Patil जळगाव : महाराष्ट्रात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी टीका करणे हे त्यांचं कामच आहे. परंतु घडणाऱ्या घटना या चिंताजनक आहेत. प्रत्येक घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जात असून यात जे दोषी असतील. त्यांच्यावर कठोर शिक्षा केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. जळगाव येथे (Jalgaon) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

गोळीबार होण्याअगोदर मॉरिस मुख्यमंत्री यांना भेटले यावर विरोधक टीका करत आहेत. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत की, त्यांना दिवसभरामध्ये 5 हजारापेक्षा अधिक लोक भेटतात आणि त्यांचे हे वैशिष्ट्य आहे की, ते प्रत्येक माणसाची दखल घेतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर फोटो काढला असेल तर त्यांचा काही त्याच्याशी संबंध आहे, असं म्हणणं योग्य नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

कोण काय म्हणतंय, यावर टिपणी करणे मला योग्य वाटत नाही

राऊत आता जे बोलतात त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) टोला लगावला आहे. लोकशाहीची सुंदरता अशी आहे की, कोणालाही काहीही म्हणण्याची स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोण काय म्हणतंय, यावर टिपणी करणे मला योग्य वाटत नाही असे म्हणत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणे चंद्रकांत पाटलांनी टाळले आहे. 

पुणे येथील वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण

पुणे (Pune) येथे भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जो विकास झाला त्या विकासानंतर सरकार 2019 मध्ये यायला पाहिजे होतं. मात्र ज्या पद्धतीने दृष्ट लागते त्या पद्धतीने दृष्ट लागली आणि सरकार आले नाही त्यामुळे विकासात त्या काळात ठप्प झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाल्यानंतर या सरकारमध्ये परत वेगाने विकास सुरू झाला असे मी जाहीर भाषणात बोललो होतो, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटलांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 

एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना खूप चांगला आयुष्य लाभो, त्यांची विकासाची दृष्टी अजून विकसित हो आणि आगामी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळू दे आशा शुभेच्छा देत त्यांनी खूप संवेदनशील मुख्यमंत्री हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. 

एकनाथ खडसेंच्या मालमता जप्तीच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी बोलणे टाळले

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची मालमत्ता जप्त होणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटले होते दरम्यान याबाबत पत्रकारांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न उपस्थित केला असता सर्वच प्रश्नांना उत्तर देण्यास मी सर्वज्ञ नसल्याचे म्हणत एकनाथ खडसे यांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी जय हिंद जय महाराष्ट्र केला आहे.

आणखी वाचा 

Morris Noronha: मी अभिषेकला सोडणार नाही, संपवणारच! मॉरिस सतत एकच वाक्य बोलायचा, मॉरिसच्या पत्नीचा जबाब

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget