'मोदींचे नेतृत्व मान्य, पण रक्षा खडसेंना माझी आवश्यकता नसेल तर...', चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा
Raver Lok Sabha : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार यांच्याबाबत सूचक वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Chandrakant Patil : आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं नेतृत्व मान्य केले आहे. मात्र रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना माझी आवश्यकता नसेल तर समजून घ्यावे लागणार आहे, असे सूचक वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी रक्षा खडसे यांच्याबाबत केले आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रक्षा खडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मी मान्य केलंय
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी 100 वेळा सांगितलं आहे की, नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मी मानतो आहे. त्यांच्यासाठी मी काम करणार आहे. मात्र रक्षा खडसेंना माझी आवश्यकता नसेल तर समजून घेऊ. मी महायुतीचा घटक आहे. त्याप्रमाणे काम करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
रक्षा खडसे यांना माझ्या मदतीची आवश्यकता नाही
खडसेंचे कुटुंब नेहमी माझ्या विरोधात बोलतात. त्या प्रकारे महायुतीतील घटक रक्षा खडसेही माझ्या विरोधात बोलायला लागल्या का? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. रक्षा खडसे यांना माझ्या मदतीची आवश्यकता नाही. त्यांनी आधीच त्यांनी डिक्लेअर केले आहे की, मतदारसंघात खूप मोठा विकास केला आहे. खासदारांना असं वाटत असेल की यांची आम्हाला आवश्यकता नाही तर तेही आम्ही समजून घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनीच दिली आहे. एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. तसेच जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी देखील देखील याचा भाजपला फायदा होईल, असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता जळगाव आणि रावेरमध्ये नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा