एक्स्प्लोर

Banana Crop Insurance Scam: केळी पिकासाठी 217 कोटींचा विमा लाटण्याचा मोठा डाव उघड, उपग्रहाने केला भांडाफोड; जळगावात नेमकं काय घडलं?

Banana Crop Insurance Scam: केळी पिकाच्या विम्याच्या नावाखाली तब्बल 217 कोटी रुपयांचा सरकारी निधी लाटण्याचा मोठा डाव उघडकीस आला असून, या प्रकरणाचा भंडाफोड उपग्रहाद्वारे केलेल्या तपासणीत झाला आहे.

Banana Crop Insurance Scam: केळी पिकाच्या विम्याच्या नावाखाली तब्बल 217 कोटी रुपयांचा सरकारी निधी लाटण्याचा मोठा डाव उघडकीस आला असून, या प्रकरणाचा भंडाफोड उपग्रहाद्वारे केलेल्या तपासणीत झाला आहे. केळीची लागवडच नसताना लागवड दाखवून पीक विम्याचे अर्ज सादर करण्यात आल्याचे समोर आले असून, एकट्या जळगाव जिल्ह्यात हजारो बनावट अर्ज आढळले आहेत.

Banana Crop Insurance Scam: उपग्रह तपासणीत धक्कादायक वास्तव

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहर हंगामात यंदा जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी अर्जांची संख्या अचानक वाढल्याने संशय निर्माण झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 27 हजार 259 अर्जांची वाढ झाली असून, विमा संरक्षित क्षेत्र तब्बल 28 हजार 196 हेक्टरने वाढले. ही वाढ अनैसर्गिक वाटल्याने कृषी आयुक्तालय यांनी उपग्रहाच्या सहाय्याने तपासणी केली.

या तपासणीत जिल्ह्यातील 96 हजार 152 हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रापैकी केवळ 52 हजार 110 हेक्टरवरच केळीची लागवड असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित 44 हजार 41 हेक्टर क्षेत्रावर केळी पीकच नसल्याचे आढळून आले. म्हणजेच, मोठ्या प्रमाणावर बनावट विमा अर्ज दाखल करण्यात आले होते.

Banana Crop Insurance Scam: 37 कोटींचा विमा हप्ता जप्त, 217 कोटींचा निधी वाचला

या बनावट अर्जदारांनी विमा हप्त्यापोटी भरलेले 37 कोटी 43 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, वेळेत तपासणी झाल्याने राज्य सरकारचा 123 कोटी 53 लाख आणि केंद्र सरकारचा 93 कोटी 58 लाख असा सुमारे 217 कोटी रुपयांचा अनुदान निधी वाचला आहे.

Banana Crop Insurance Scam: चार तालुक्यांत थेट फसवणूक

कृषी आयुक्तांच्या पथकाने केलेल्या प्रत्यक्ष तपासणीत चार तालुक्यांतील 74 शेतकऱ्यांकडे केळी पीकच नसल्याचे आढळले. या शेतकऱ्यांनी अवघा 8 लाखांचा विमा हप्ता भरून सव्वा दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई लुबाडण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

Banana Crop Insurance Scam: गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

या बनावट अर्जदारांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाचा विम्यात सर्वाधिक वाटा असल्याने अशा प्रकारचे गैरप्रकार वारंवार समोर येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Banana Crop Insurance Scam: प्रशासनाकडून अहवालाची प्रतीक्षा

दरम्यान, जिल्हा कृषी अधीक्षकांनी सांगितले की, अद्याप कृषी आयुक्तालय किंवा विमा कंपनीकडून अधिकृत अहवाल प्राप्त झालेला नसल्याने सविस्तर आकडेवारी उपलब्ध नाही. तर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही या प्रकरणाचा अहवाल मागवून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा 

HSC Exam Mass Copying Case: जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरण शिक्षकांना चांगलंच भोवणार, राज्य सरकारकडून गंभीर दखल, मोठी कारवाई होणार

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget