एक्स्प्लोर

HSC Exam Mass Copying Case: जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरण शिक्षकांना चांगलंच भोवणार, राज्य सरकारकडून गंभीर दखल, मोठी कारवाई होणार

HSC Exam Mass Copying Case: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर (ता. कन्नड) येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर घडलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

HSC Exam Mass Copying Case: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील जैतापूर (ता. कन्नड) येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर घडलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली असून, या प्रकरणात मोठी व कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखालीच विद्यार्थ्यांना सामूहिकरित्या कॉपी पुरवली जात असल्याचे दृश्य समोर आल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेची राज्य सरकारने (Maharashtra Government) तातडीने आणि गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित शिक्षण संस्था चालक, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांवर कठोरात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात आला असून, परीक्षेनंतर विभागीय स्तरावर समितीमार्फत सखोल चौकशी होणार आहे.

HSC Exam Mass Copying Case: दोषी आढळल्यास परीक्षा केंद्रच रद्द होणार

चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करणे, भविष्यात त्या केंद्राला परीक्षा घेण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरवणे, तसेच संबंधित अधिकारी व शिक्षकांवर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारकडून देण्यात आला आहे.

HSC Exam Mass Copying Case: ‘कॉपीमुक्त’ अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा

राज्यात 10 फेब्रुवारीपासून बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली असली, तरी पहिल्याच दिवशी ‘कॉपीमुक्त परीक्षा’ या शासनाच्या अभियानाला मोठा धक्का बसला आहे. काही परीक्षा केंद्रांवर खुद्द अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या केंद्रांवर असे गैरप्रकार घडले आहेत, त्यांची मान्यता तात्काळ रद्द केली जाईल आणि भविष्यात त्यांना पुन्हा परीक्षा केंद्र म्हणून परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच केवळ विद्यार्थीच नव्हे, तर केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि गरज भासल्यास पालकांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

HSC Exam Mass Copying Case: 19 जण निलंबित; आणखी कारवाईची शक्यता

जैतापूर येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने 19 जणांना निलंबित केले आहे. यात झेडपीचे 3 शिक्षक, 2 केंद्रसंचालक, 17 पर्यवेक्षक आणि बैठ्या पथकातील सदस्यांचा समावेश आहे. काही खासगी शिक्षण संस्थांचे कर्मचारीही या कारवाईच्या कक्षेत आले आहेत. या केंद्रावर 14 वर्गांमध्ये सुमारे 370 विद्यार्थी परीक्षा देत होते.

आणखी वाचा 

Mumbai University: मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, 304 अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद, नेमकं कारण काय? विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Ahilyanagar Success Story : शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
SSC HSC Exam Copy: दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी, 22 शिक्षक, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी, 22 शिक्षक, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
Embed widget