एक्स्प्लोर
Advertisement
कुठे काम करायला आवडेल? आदित्य ठाकरे म्हणतात...
विधान भवनाचं कामकाज बघायला तुम्ही आला होतात, आज संसदेमध्ये आलेला आहात. कुठे काम करायला जास्त आवडेल? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला.
नवी दिल्ली : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवसेना खासदारांकडून आदित्य यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. आदित्य ठाकरेंनी प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी आणि हर्षवर्धन या तीन मंत्र्यांची भेट घेतली.
विधान भवनाचं कामकाज बघायला तुम्ही आला होतात, आज संसदेमध्ये आलेला आहात. कुठे काम करायला जास्त आवडेल?
असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार आणि खासदार निवडून आणायचे आहेत, त्यामुळे दोन्ही ठिकाणी काम करायला आवडतं, असं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं.
'प्री प्रायमरी, केजी, माँटेसरी शाळांमध्ये डोनेशन घेतलं जातं. त्यांच्यासाठी काही कायदे नाहीत, राइट टू एज्युकेशन मध्येही त्यांचा समावेश नाही. प्री प्रायमरीमध्येच डोनेशन सुरु झालं, तर मग पुढे काय?' असा सवाल आदित्य ठाकरेंनी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना विचारला.
या शाळा कधी अॅडव्हान्स डोनेशन घेतात, आई-वडिलांच्या मुलाखती घेतात, त्यांचे इकॉनॉमिक स्टेटस बघतात. प्री प्रायमरी, मॉन्टेसरीसाठीही काही कायदा असावा, किंवा त्यांना 'राईट टू एज्युकेशन' लागू करावं, जेणेकरुन अॅडमिशन त्याच वर्षी मिळेल, शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक असेल आणि आई वडिलांच्या मुलाखती बंद होतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुलींच्या सुरक्षेविषयीही आदित्य ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. पाचवीपासूनच विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स शिकवावा. केवळ मुलींनाच नाही, तर मुलांनाही गुड टच आणि बॅड टच मधील फरक ओळखायला शिकवला जावा, अशी मागणी आदित्य यांनी केली.
महाराष्ट्रात जशी प्लास्टिकबंदी आहे, तशी ती देशभरात लागू करण्याची विनंती आदित्य यांनी पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली. देशभरात काही राज्यांनी आधीच प्लास्टिक बंदी जाहीर केलेली आहे, पण हा निर्णय संपूर्ण देशभरात लागू व्हायला हवा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईतील माहुलमध्ये बीपीसीएल प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाबद्दल चर्चा आहे. अशा प्रदूषणामुळे बाधित रहिवाशांचं पुनर्वसन व्हायला हवं, अशीही मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
महामार्गावर ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो, तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येईल, असा प्रस्ताव आदित्य ठाकरेंनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडला. ज्या ठिकाणी ऊन जास्त आहे, तिथे सोलर पावरचा वापर करता येईल, असंही आदित्य यांनी सुचवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement