एक्स्प्लोर
21 वर्षीय प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेसची घराबाहेर भोसकून हत्या
नवी दिल्ली : भारताच्या राजधानीत महिलांवरील गुन्ह्यांची वेगवेगळी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. एअर हॉस्टेसचं शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणीची भोसकून हत्या झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे.
ईशान्य दिल्लीत मंगळवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये हत्येचा थरार कैद झाला आहे. आदिल नावाचा 21 वर्षीय युवक तरुणीला भोसकताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
तरुणीच्या राहत्या घराबाहेर भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. व्हिडिओमध्ये तरुणीचं आरोपीसोबत भांडण होत असल्याचं सुरुवातीला दिसत आहे. त्यानंतर आरोपीने सुरा काढून तिच्यावर वार केले.
मारेकऱ्यावर कारचोरीसह आणखी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने आपल्या मुलीवर वार का केले, हे कळत नसल्याचं तरुणीच्या पालकांनी पोलिसांना सांगितलं. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement