एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या येडियुरप्पांनी ज्योतिषाच्या सल्ल्याने नावातही चौथ्यांदा बदल केला

कर्नाटकातील नेते एचडी रेवन्ना यांना याआधी बिना चपलेने विधानसभेत येताना अनेकदा पहिले आहे. तर सिद्धारमैया यांच्या अंधश्रद्धेबाबतच्या कथाही प्रसिद्ध आहेत. या लिस्टमध्ये आता कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा देखील समावेश झाला आहे.

बंगळुरु : कर्नाटकमधील राजकीय नाट्यामध्ये आपली खुर्ची वाचविण्यासाठी नानाविध उपाय केले गेले. सत्तेसाठी मंदिराच्या पायऱ्या झिजवल्या सोबतच ज्योतिष विधी देखील केला गेला. आता याचा फायदा झाल्याचा दावा देखील होत आहे. कर्नाटकातील नेते एचडी रेवन्ना यांना याआधी बिना चपलेने विधानसभेत येताना अनेकदा पहिले आहे. तर सिद्धारमैया यांच्या श्रद्धेबाबतच्या कथाही प्रसिद्ध आहेत. या लिस्टमध्ये आता कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा देखील समावेश झाला आहे. चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या येडियुरप्पा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला अच्छे दिन यावेत म्हणून आज चौथ्यांदा आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे.  राज्यपालांना लिहिलेल्या पत्रापासून  ते आपल्या ट्विटर हॅण्डलपर्यंत सर्व ठिकाणी येडियुरप्पा यांनी नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा हे आपलं नाव 'YEDDYURAPPA' असं लिहायचे मात्र आता ते स्पेलिंग 'YEDIYURAPPA' असं केलं आहे.  76 वर्षीय येडियुरप्पा आज चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले मात्र त्यांना मुख्यमंत्रीपदी किती दिवस राहू याची चिंता आहे. यापूर्वी 2018 मध्ये सरकार स्थापन झाल्यावर ते केवळ दोन दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते. यामुळे यावेळी त्यांनी कुठलीही जोखीम न पत्करता आपली राजकीय खेळी खेळली आहे. याच कारणामुळे त्यांनी आपल्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. येडियुरप्पा यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करण्याच्या कथा सुरस आहेत. त्यांचे जे आताचे  "BS YEDIYURAPPA"हे नाव आहे तेच त्यांचे पहिले नाव आहे. याच नावाने त्यांनी 2007 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र त्यावेळी ते केवळ सात दिवसांचे मुख्यमंत्री राहिले होते. यानंतर त्यांनी ज्योतिषशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार आपल्या नावात बदल करत "BS Yeddyurappa"  असं केलं होतं. 2008 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आले. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना 2011 साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. विशेष म्हणजे मागील तीन प्रयत्नांत त्यांना पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.  80 च्या दशकात येडियुरप्पा यांचे नाव  "BS YEDDYOORAPPA"असं होतं. याचा अर्थ असा की ज्या-ज्या वेळी राजकीय अडचणी आल्या त्या-त्या वेळी येडियुरप्पा यांनी आपल्या नावामध्ये बदल केला  आहे. आता या नव्या नावासह ते सत्तेची खुर्ची किती काळ टिकवतात याकडे नजरा लागून आहेत. राजकीय नाट्यानंतर अखेर बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. येडियुरप्पा चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेस-जेडीसचं सरकार अल्पमतात आल्यानंतर कुमारस्वामी यांनी राजीनामा दिला होता. शुक्रवारी सकाळीच येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी तो स्वीकारल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला. आता 31 जुलैपर्यंत येडियुरप्पा यांना आपले बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे. गेल्या अनेक अनेक दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर कर्नाटकात पुन्हा एकदा येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी तेथील भाजपा कार्यालयात जाऊन अन्य नेत्यांची भेट घेतली. कर्नाटकातील 17 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कर्नाटक सरकार अल्पमतात आले होते. शुक्रवारी सकाळीच येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी तो स्वीकारल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला. आता 31 जुलैपर्यंत येडियुरप्पा यांना आपले बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी बंगळुरू येथील भाजप कार्यालयात काही नेत्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी बंगळुरू येथील काडू मल्लेश्वर मंदिरात जाऊन पूजाही केली. संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget