एक्स्प्लोर

Year Ender 2022 : राजकारण ते मनोरंजन, वर्षभरात काय घडलं? या दहा घटनांमुळे 2022 वर्ष राहिल लक्षात

Year Ender 2022 : सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षातील अनेक महत्वाच्या घडामोडी आपल्या डोळ्यासमोरून जातात. राजकारणापासून मनोरंजन विश्नापर्यंत अनेक महत्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे 2022 हे वर्ष लक्षात राहणार आहे.

Year Ender 2022 : 2022 या वर्षातील शेवटचा महिना सुरू आहे. आणखी 26 दिवसांनी 2022  वर्ष आपल्याला निरोप देणार आहे. त्यानंतर आपण नव्या वर्षाचे म्हणजे  2023 चे स्वागत करणार आहोत. सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षातील अनेक महत्वाच्या घडामोडी आपल्या डोळ्यासमोरून जातात. 2022 या वर्षात खेळांमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला आणि महिला संघाने रौप्यपदक जिंकले. मात्र, पुरुषांच्या T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा प्रवास उपांत्य फेरीतील मानहानीकारक पराभवाने संपुष्टात आला. देशाच्या राजकारणात देखील अनेक उलथापालथी झाल्या आहेत.  काँग्रेसला 25 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला, तर यूपी-उत्तराखंड आणि गोव्यात भाजपचे पुनरागमन झाले.  

पीएम मोदींच्या सुरक्षेत चूक : 2022 वर्षाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.  जानेवारी महिन्यातच वैष्णो माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 5 जानेवारी रोजी पंजाबमध्ये पीएम मोदींच्या सुरक्षेत मोठी निष्काळजीपणा करण्यात आल्याचे समोर आले. पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी एका पुलावर अडवले. जवळपास अर्धा तास पंतप्रधान मोदी येथे अडकले होते. पंतप्रधान मोदींचा ताफा जिथे थांबला तिथून पाकिस्तानची सीमा फक्त 20 किमी अंतरावर आहे. 

हिजाब वाद : कर्नाटकात हिजाबचा वाद ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झाला होता. परंतु, यावर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणाने चांगलाच जोर धरला होता. 5 राज्यांतील निवडणुका पाहता या प्रकरणावरून बरेच राजकारण झाले. सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून देण्यात आला नाही. त्यामुळे हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे आहे.
 
पाच राज्यांचे निवडणूक निकाल : यावर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनी देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली. भाजपने यूपी आणि उत्तराखंडमध्ये पुनरागमन करून इतिहास रचला. सीएम योगींनी यूपीत अखिलेश यादव यांचा मोठ्या फरकाने पराभव करत दुसऱ्यांदा सत्ता ताब्यात घेतली. तर पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांच्या झाडूने संपूर्ण विरोध धुळीस मिळवत पंजामध्ये सत्ता स्थापन केली. या विजयाने केजरीवाल हे राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याचे सिद्ध झाले आहे. गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपची सत्ता आली.

काँग्रेसला मिळाला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष : काँग्रेसला तब्बल 24 वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा पराभव केला. निवडणुकीत खरगे यांना 7,897 मते मिळाली. 

महाराष्ट्र-बिहारमध्ये सत्ता बदल : यंदा महाराष्ट्र आणि बिहारमध्येही सत्तापरिवर्तन पाहायला मिळाले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मदतीने भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. तर बिहारमध्ये भाजप सत्तेतून बाहेर फेकला गेला. नितीशकुमार यांनी आरजेडीसोबत महाआघाडीचे सरकार स्थापन करून भाजपला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

नुपूर शर्मा वाद : भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीने देशातच नाही तर संपूर्ण जगात खळबळ उडाली. नुपूर शर्माच्या अटकेसाठी देशभरात हिंसक निदर्शने झाली. सौदी अरेबिया आणि कतारसह सर्व मुस्लिम देशांनीही नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी नुपूर शर्मा यांचे वादग्रस्त विधान टाळत भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
 
पीएफआयवर बंदी : नुपूर शर्माच्या वक्तव्यावर देशभरातील मुस्लिम संघटनांनी 'सर तन से जुडा'चा नारा देत निदर्शने केली. यानंतर काही दिवसांनी उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालची दोन मुस्लिम तरुणांनी निर्घृणपणे गळा चिरून हत्या केली होती. आरोपींनी या हत्याकांडाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. अशीच एक घटना महाराष्ट्रातील अमरावती येथूनही समोर आली आहे. या घटनांमुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामागे पीएफआयला जबाबदार धरण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने धार्मिक उन्माद पसरवल्याच्या आरोपावरून या मुस्लिम संघटनेवर बंदी घातली.

द काश्मीर फाइल्सवरून वाद : काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचे वर्णन करणारा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु, या चित्रपटावरून बरेच वाद झाले. विरोधकांसह देशातील एका मोठ्या वर्गाने या चित्रपटाला अपप्रचार म्हणत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. यानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले. आता पुन्हा एकदा या चित्रपटावरुन वाद सुरु झाला आहे. 

लता मंगेशकर यांचे निधन : गायिका लता मंगेशकर यांचे या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी करिअरला सुरुवात केली. त्यांनी भारतातील अनेक भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

  श्रद्धा हत्याकांड  : दिल्लीतील मेहरौली येथील श्रद्धा हत्याकांडाने तर देशात एकच खळबळ उडाली. श्रद्धाच्या हत्येचा आरोप तिचा प्रियकर आफताबवर आहे. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकून दिले. या वर्षातील ही सर्वात भयंकर हत्याकांड आहे. आफताब सध्या तिहार तुरुंगात आहे. दिल्ली पोलिस अजूनही पुरावे शोधत आहेत. पोलिसांना अद्याप श्रद्धाचं डोकं सापडलेले नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Embed widget