एक्स्प्लोर
Advertisement
1 हजार 345 किलोचा केक, गोव्यात विश्व विक्रम
केक बनवण्यासाठी 300 किलो स्पन्ज, 200 किलो डार्क चॉकलेट, 60 किलो चेरी, 200 अंडी, 50 किलो काजू अशा कित्येक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे.
गोवा : गोव्यामध्ये तब्बल 1 हजार 345 किलोचा केक बनवून नवीन विश्व विक्रम करण्यात आला. सेलिब्रिटी शेफ वरुण इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हा केक बनवला गेला. गोव्याच्या ट्रिनिटी ग्रुपने हा केक बनवत रेकॉर्ड केलाय.
केक बनवण्यासाठी 300 किलो स्पन्ज, 200 किलो डार्क चॉकलेट, 60 किलो चेरी, 200 अंडी, 50 किलो काजू अशा कित्येक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. हा केक तयार करण्यासाठी तब्बल 8 तास लागले. गिनीज बुक ऑफ विश्व विक्रम मध्ये आतापर्यंत 500 किलोच्या केकच्या रेकॉर्डची नोंद होती. पण ट्रिनिटी ग्रुपने 1345 किलोचा केक बनवत नवीन विश्व विक्रम केला.
गेल्या वर्षीसुद्धा ट्रिनिटी ग्रुपने 300 किलोची ‘फिश पेटी’ बनवला होता. या फिश पेटीची नोंद गिनीज बुकात करण्यात आली होती.
केंद्रिय राज्यमंत्री आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी केक कापून विश्व विक्रम साजरा करण्यात आला. सांगोल्डा येथील फूड बँकेतर्फे अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात या केकचं वाटप करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement