एक्स्प्लोर

World Population Day: लोकसंख्या वाढीत वर्षभरात भारत चीनला मागे सारणार; UN चा नवा अहवाल

World Population Day: येत्या वर्षभरात भारत चीनला लोकसंख्येच्याबाबतीत मागे टाकणार असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.

World Population Day: सध्या जगात चीन आणि भारत हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. सध्या जगात चीनची लोकसंख्या (China Population) जगात सर्वाधिक आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक आहे. मात्र, आता लवकरच भारताची लोकसंख्या ही चीनपेक्षा अधिक होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने (UN Report On Population) याबाबतचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. येत्या वर्षभरात भारत चीनला लोकसंख्येत मागे टाकणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

संयुक्त राष्ट्र संघाने World Population Day च्या निमित्ताने सोमवारी एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार, नोव्हेंबर 2022 च्या मध्यापर्यंत जगातील लोकसंख्या आठ अब्ज होण्याचा अंदाज आहे. सर्वाधिक लोकसंख्या ही आशिया खंडात असणार आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 61 टक्के लोकसंख्या आशिया खंडात आहे. आशिया खंडात 4.7 अब्ज लोकसंख्या आहे. त्यानंतर आफ्रिका खंडात  1.3 अब्ज लोकसंख्या वास्तव्य करते. जगातील लोकसंख्येच्या अनुषंगाने हा वाटा 17 टक्के इतका आहे. त्याशिवाय युरोपमध्ये 75 कोटी म्हणजे 10 टक्के लोकसंख्या आहे. तर, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये 65 कोटी लोकसंख्या आहे. तर, उत्तर अमेरिकेत 37 कोटी आणि ओसिनियामध्ये 4.3 कोटी लोक वास्तव्य करत आहेत. 

चीनच्या लोकसंख्येत घट

World Population Prospects 2019 नुसार सध्या चीनची लोकसंख्या 1.44 अब्ज आहे. तर, दुसऱ्या स्थानावर भारत असून 1.39 अब्ज लोकसंख्या आहे. जगातील एकूण लोकसंख्येत चीनचा वाटा 19 टक्के आणि भारताचा वाटा 18 टक्के आहे. एका अहवालानुसार, वर्ष 2023 पर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होणार आहे. चीनच्या लोकसंख्येत वर्ष 2019 ते वर्ष 2050 या कालावधीत 3.14 कोटी म्हणजे 2.2 टक्क्यांनी घट होणार आहे. 

UN Department of Economic and Social Affairs च्या अंदाजानुसार, जगातील लोकसंख्या ही 1950 नंतर आतापर्यंतची सर्वात धीम्या गतीने वाढत आहे. या अंदाजानुसार,  जगातील लोकसंख्या ही वर्ष 2030 पर्यंत 8.5 अब्ज इतकी होईल. वर्ष 2050 पर्यंत जगातील एकूण लोकसंख्या 9.7 अब्ज इतकी होईल, असा अंदाज आहे. 2080 मध्ये जगाची लोकसंख्या 10.4 अब्ज इतकी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, अनेक विकसनशील देशाच्या जन्मदरात घट झाली आहे. येत्या काही वर्षात आठ देशांची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे. यामध्ये कांगो, इजिप्त, इथियोपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपाइन्स आणि टांझानिया या देशांचा समावेश आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget