एक्स्प्लोर
टिक टॉकची कमाल, तीन वर्षांपूर्वी सोडून गेलेला नवरा सापडला
या प्रकरणी पोलिसांनी सुरेश यांची चौकशी केली असता कौटुंबिक कारणांमुळे समाधानी नसल्याचे सुरेश यांनी सांगितले. तसेच म्हणूनच सुरेश घरातून होसूरला पळून गेले आणि तिकडे नोकरी करत होते.

चेन्नई : भारतात ज्या अॅपमुळे गदारोळ माजला होता अशा टिक टॉक अॅपमुळेच एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. तामिळनाडूतील विल्लूपूरम जिल्ह्यातील आपल्या पत्नी आणि मुलांना सोडून गेलेला पती तब्बल तीन वर्षांनी सापडला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्यक्ती टिक टॉकवर टाकलेल्या व्हिडीओमुळे सापडला. जयाप्रदा आणि सुरेश हे दांपत्य आपल्या दोन मुलांना घेऊन राहत होते. 2016 साली सुरेश आपल्या कामाला जाण्यासाठी घरा बाहेर पडला, पण तो परत आलाचं नाही. जयाप्रदा यांनी सुरेश यांच्या नातेवाईकांकडे, मित्रांकडे बरीच चौकशी केली, पण सुरेश यांची कोणतीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर अखेर त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. Tik Tok | हातात कोयता घेऊन व्हिडीओ केल्याप्रकरणी एकाला बेड्या | पिंपरी | ABP Majha अखेर काही दिवसांनी जयाप्रदा यांना त्यांच्या नातेवाईकांनी टिक टॉकवर एका व्हिडीओमध्ये एका तृतीयपंथीसोबत सुरेश यांच्यासारखे कुणीतरी असल्याचे सांगितले. व्हिडीओ पाहिला असता त्यात असणारी व्यक्ती आपलेच पती असल्याचे खात्री जयाप्रदा यांना पटली. त्यानंतर लगेचच जयाप्रदा यांनी विल्लुपुरम पोलिसात जाऊन हा सगळा प्रकार सांगितला. जयाप्रदा यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुरेश यांचा शोध घेतला. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश यांची चौकशी केली असता कौटुंबिक कारणांमुळे समाधानी नसल्याचे सुरेश यांनी सांगितले. तसेच म्हणूनच सुरेश घरातून होसूरला पळून गेले आणि तिकडे नोकरी करत होते. या प्रकरणात पोलिसांनी पती-पत्नीला समज देऊन सोडून दिलं.
आणखी वाचा























