एक्स्प्लोर

Wipro on Moonlighting : मूनलाईटिंगचा ठपका ठेवत विप्रोकडून एकाचवेळी 300 कर्मचाऱ्यांना 'नारळ'!

Wipro on Moonlighting : विप्रोमध्ये कार्यरत असतानाच स्पर्धक कंपनीसोबतही काम करताना आढळल्याने 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Wipro on Moonlighting : विप्रोमध्ये कार्यरत असतानाच स्पर्धक कंपनीसोबतही काम करताना आढळल्याने विप्रो कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीचे 300 कर्मचारी एकाच वेळी त्यांच्या एका स्पर्धकांसोबत काम करत असल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

ऋषद प्रेमजी यांनी मूनलाईटिंगला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहताना मूनलाईटिंग हा  पूर्णत: नैतिकतेचे उल्लंघन करणारं असल्याचे म्हटले आहे. ऋषद प्रेमजी यांनी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनात बोलताना सांगितले की, वास्तविक काढून टाकण्यात आलेले कर्मचारी आज विप्रोसाठी काम करत असतानाच ते आमच्या प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाकडे थेट काम करत होते. आम्ही गेल्या काही महिन्यांत 300 लोक शोधले आहेत जे तेच करत होते. 

नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटचा निर्णयाला विरोध 

दरम्यान, या निर्णयानंतर NITES चे (Nascent Information Technology Employees Senate NITES) अध्यक्ष हरप्रित सिंग सलूजा यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.  सलूजा यांनी म्हटले आहे की, विप्रोने मूनलाइटिंगच्या नावाखाली सुमारे 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे निराशाजनक आहे. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट NITES संस्थेच्या या अनैतिक कृतीचा निषेध करते. आयटी क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या बेकायदेशीर कलमांविरुद्ध कायदेशीर लढाईची तयारी करत असल्याने आम्ही या कर्मचार्‍यांना पुढे येण्याचे आणि आमच्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे. 

ते पुढे म्हणाले की, ऑफर लेटर आणि एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेल्या कलमांचा न्यायव्यवस्थेने कायदेशीररित्या पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. कर्मचार्‍यांना मनमानी पद्धतीने कामावरून काढून टाकणे अनैतिक आणि बेकायदेशीर असून, पीडित कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी NITES युनियन कोणतीही कसर सोडणार नाही.

मूनलाइटिंग म्हणजे नक्की काय?

गेल्या काही दिवसांपासून मूनलाइटिंगबद्दल चर्चा आहे, पण हा प्रकार अगदीच नवीन नाही. पूर्वीपासून हे चालत आलं आहे. मूनलाइटिंग म्हणजेच आपल्याला नोकरीच्या ठिकाणी जे काम नेमून दिलं आहे. म्हणजे तुमचा जॉब समजा10 ते 5 आहे आणि तो तुम्ही पूर्ण केला. पण त्याव्यतिरिक्त तुम्ही जे काही काम बाहेर करता त्याला मूनलाइटिंग म्हणतात. 

म्हणजेच तुम्ही जॉबनंतर एक्स्ट्रा पैसे कमविण्यासाठी जी धडपड करतात जे कंपनीला माहिती नसते ते मूनलाइटिंग व्याख्येत येते. नावाप्रमाणेच, मूनलाइटिंगचा अर्थ चंद्राच्या प्रकाशाखाली किंवा सामान्य कामकाजाच्या वेळेच्या बाहेर रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी केले जाणारे दुसरे काम.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
×
Embed widget