एक्स्प्लोर

जुन्या नोटांसाठी परभणीच्या शेतकऱ्यांना सुप्रीम कोर्टात का जावं लागलं?

नवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यान ज्या नागरिकांना 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा करता आल्या नाहीत त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने या लोकांना एक संधी देण्याबाबत केंद्र सरकारला विचार करण्यास सांगितलं आहे. विविध याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला. ज्या सात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या, त्यात महाराष्ट्रातल्या परभणीच्या दोन शेतकऱ्यांच्या वतीनेही एक याचिका होती. अजित यादव आणि गणेश निर्मळ अशी या दोन शेतकऱ्यांची नावं आहेत. परभणीच्या शेतकऱ्यांना सुप्रीम कोर्टात का जावं लागलं? नोटाबंदीदरम्यान सोयाबीनचे साडेपाच लाख रुपये घेऊन जात असताना हे पैसे निवडणूक प्रचारासाठी चालले असल्याच्या संशयातून आयकर विभागाने पकडले होते. हे पैसे त्यांना आयकर विभागाकडून परत मिळाले 9 जानेवारीला. मात्र तोपर्यंत 30 डिसेंबरची मुदत उलटून गेली होती. शिवाय सरकारने जेव्हा 8 नोव्हेंबरचा निर्णय जाहीर केला होता, त्यात योग्य कारण देऊन तुम्ही 30 डिसेंबरनंतरही पैसे जमा करु शकाल असं म्हटलं होतं. मात्र नंतर केवळ जे लोक परदेशात असल्याच्या कारणाने पैसे जमा करु शकले नव्हते अशाच लोकांना ही संधी मिळाली. त्यामुळे सरकारच्या नोटफिकेशनमधल्या बदलामुळे आपल्याला पैसे जमा करता आले नाहीत, असा दावा करत त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. दिलीप तौर यांनी या शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टात बाजू मांडली. यासंदर्भातली पुढली सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे. जुन्या नोटा बदलण्याची डेडलाईन केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर जुन्या नोटा बँकांत जमा करण्यासाठी 30 डिसेंबर 2016 पर्यंतची डेडलाईन दिली होती. तर एनआरआय नागरिकांसाठी अखेरची तारीख 30 जुलै आहे. तर 20 जुलैपर्यंत जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करु शकता. जुन्या नोटा 31 मार्चपर्यंत रिझर्व बँकेत जमा करता येऊ शकतात, असं आरबीआयने सांगितलं होतं. मात्र 30 डिसेंबर 2016 च्या मुदतीनंतर पैसे जमा का केले नाहीत, याचं कारण देण्याची अटही आरबीआयने घातली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
मोठी बातमी, पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
Israel Iran Conflict : अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 
अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 

व्हिडीओ

Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
Embed widget