एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिद कसुरी कोण? हाफिज सईदचा निकटवर्तीय अन् TRFचा प्रमुख दहशतवादी भारताच्या रडारवर  

Who Is Saifullah Khalid Kasuri : सैफुल्लाह खालिद हा TRF या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असून जम्मू काश्मीरमधील कारवाया या त्याच्या नियंत्रणात चालतात अशी माहिती आहे. 

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यंटकांवर हल्ला करून 27 जणांचा जीव घेतला. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे केवळ भारतच नव्हे तर जगभर खळबळ उडाल्याचं दिसून येतंय. 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी 'लष्कर ए तैयबा'च्या संलग्नित दहशतवादी संघटना द रेजिस्टंट फ्रन्टने (TRF) घेतली आहे. पहलगामच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हा सैफुल्ला खालिद उर्फ सैफुल्लाह कसुरी हा असल्याचं समोर आलं आहे. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कारवाईचे नियंत्रण हा सैफुल्लाह खालिद करत असल्याची माहिती आहे.

Who Is Saifullah Khalid Kasuri : कोण आहे सैफुल्लाह खालिद? 

सैफुल्लाह खालिद उर्फ सैफुल्लाह कसुरी हा लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख असल्याची माहिती आहे. सैफुल्लाह खालिदचे लष्कर-ए-तोयबाचा सह-संस्थापक हाफिज सईदशी संबंध असल्याचेही माहिती आहे.

सैफुल्लाह खालिद हा सैफुल्लाह साजिद जट, अली, हबीबुल्ला आणि नौमान यासह अनेक नावांनी ओळखले जाते. तो लष्कर-ए-तैयबाचा एक प्रमुख कमांडर आणि उपप्रमुख आहे. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी आहे आणि लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईदचा सर्वात विश्वासू सहकारी आहे. तो 40-45 वर्षांचा असल्याची माहिती असून गेल्या दोन दशकांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत आहे.

Lashkar-e-Toiba Hafiz Saeed : हाफिज सईदच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण

2000 च्या दशकाच्या सुरुवातीला सैफुल्लाह लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला. पाकिस्तानातील मुरीदके येथील एलईटी कॅम्पमध्ये त्याने प्रशिक्षण घेतले. हाफिज सईदचा त्याच्या भरती आणि प्रशिक्षणात थेट हस्तक्षेप होता असे म्हटले जाते.

सैफुल्लाह हा जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ-राजौरी भागात लष्करच्या दहशतवादी कारवायांचा मुख्य सूत्रधार मानला जातो. तो पीओकेच्या कोटली जिल्ह्यातील लष्कराच्या खुईरट्टा दातेस या छोट्या दहशतवादी गटाचा प्रमुख होता. येथून दहशतवाद्यांना भारतात पाठवले जाते.

लष्कर ए तैयब्बाच्या मार्गदर्शनात काम

सैफुल्लाहने द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) आणि पीपल्स अँटी-फॅसिस्ट फोर्स (PAFF) ची स्थापना केली. हल्ल्यांची थेट जबाबदारी न घेण्यासाठी हे लोक जैश-ए-मोहम्मदसाठी काम करतात असं दाखवतात. सैफुल्लाह खालिद हा हाफिज सईदच्या खूप जवळचा आहे.

सैफुल्लाह खालिद हा पाकिस्तानातील लष्कर-उद-दावाच्या पेशावर येथील मुख्यालयाचा प्रमुख देखील आहे. त्याने मध्य पंजाब प्रांतासाठी जमात-उद-दावा (JUD) च्या समन्वय समितीत काम केल्याचे वृत्त आहे. जेयूडी हे एलईटीचे (LeT) दुसरे नाव आहे, एप्रिल 2016 मध्ये परराष्ट्र विभागाने एलईटीचे उपनाव निर्बंध यादीत समावेश केलं होतं. त्या आधी डिसेंबर 2008 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीत एलईटीचे उपनाव म्हणून समाविष्ट केले गेले होते.

Pahalgam Terror Attack Mastermind : पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड

सैफुल्लाह खालिद हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्याने हा हल्ला करण्यासाठी पाच ते सहा पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठवले होते. काही दिवसांपूर्वी तो जम्मू-काश्मीरमध्ये घुसला होता. खालिदने पाकिस्तानच्या काश्मीर धोरणातील धोरणात्मक बदलाबद्दल सार्वजनिकरित्या निराशा व्यक्त केली आहे. विशेषतः भारताने 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर तो भारताविरोधात गरळ ओकत आहे.

त्याने पाकिस्तान सरकारच्या काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या कारवाया कमी करण्याच्या निर्णयावर टीका केली होती.

2026 पर्यंत काश्मीर ताब्यात घेण्याची वल्गना

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन महिने आधी, सैफुल्लाह खालिद हा पाकिस्तानातील पंजाबमधील कंगनपूरला गेला होता. त्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन आहे.

खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या एका बैठकीत, सैफुल्लाह कसुरी भारताविरुद्ध प्रक्षोभक भाषण दिले होते . "मी वचन देतो की आज 2 फेब्रुवारी 2025 आहे. आम्ही 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर ताब्यात घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. येत्या काळात, आमचे मुजाहिदीन हल्ले तीव्र करतील" असे त्याने एका भाषणात म्हटल्याची माहिती आहे. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sindhudurg-Goa Elephant : ओंकार हत्तीची दहशत, शेतकरी आणि प्रशासन हतबल Special Report
Maharashtra Politics: भाजपला सोडून कुणाशीही युती चालेल; Sharad Pawar यांच्या भूमिकेनंतर Chandgad मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र.
Mahayuti Seat Sharing: 'आपली ताकद असेल तिथे माघार नको', स्थानिक निवडणुकीवरून BJP आक्रमक
Delhi Blast: 'षडयंत्रकारियो को बक्शा नाही जाएगा', PM Narendra Modi यांचा Bhutan मधून थेट इशारा
Delhi Blast: 'कटकारस्थान रचणाऱ्यांना सोडणार नाही', संरक्षण मंत्री Rajnath Singh यांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Embed widget