आधी छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक, आता प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा, मुख्य पुजारी दीक्षित कुटुंबाचं सोलापूर कनेक्शन!
Ram Mandir Laxmikant Dixit: छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक गागा भट्ट यांनी केला त्यांच्या 11 व्या पिढीकडून श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सोमवारी 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. काही क्षणात राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दुपारी 12.30 ते एक वाजण्याच्या आसपास प्रभू श्रीरामाची 12.30 प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. प्राणप्रतिष्ठापनासाठी फक्त 84 सेकंदाचा मुहूर्त आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाचं अनुष्ठान 121 पुजारी करणार आहे. काशीचे विद्वान आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित (Ram Mandir Laxmikant Dixit) मुख्य पुजारी आहेत. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यासह पाच जण रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनादरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यात असतील. मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित कोण आहेत? त्याबाबत जाणून घेऊयात....
लक्ष्मीकांत दीक्षित मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील राहणारे आहेत. पण मागील अनेक वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय काशीमध्ये राहत आहे. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या पूर्वजांनी नागपूर आणि नाशिक येथे अनेक धार्मिक अनुष्ठान केले आहेत. लक्ष्मीकांत दीक्षित यांचा मुलगा सुनील दीक्षित याने मीडियाशी बोलताना सांगितलं की, त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला होता. दीक्षित यांच्या पिढीकडून आता श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
कोण आहेत लक्ष्मीकांत दीक्षित? Who is Pandit Laxmikant Dixit
लक्ष्मीकांत दीक्षित वाराणसी येथील मीरघाटमधील सांगवेद महाविद्यालयातील वरिष्ठ आचार्य आहेत. सांगवेद महाविद्यालयाची स्थापना काशी नरेश यांच्या मदतीने झाली होती. पंडित लक्ष्मीकांत यांचं नाव काशीमधील यजुर्वेदाच्या विद्वानांमध्ये होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी वेद आणि अनुष्ठानाची दीक्षा आपल्या काकांकडून (गणेश दीक्षित भट्ट) यांच्याकडून घेतली आहे.
पंडित लक्ष्मीकांत यांचे पूर्वज मशहूर पंडित गागा भट्टही आहेत. गागा भट्ट यांनी 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक गागा भट्ट यांनी केला त्यांच्या 11 व्या पिढीकडून श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे.
अभिषेक करण्यासाठी शुभ वेळ
प्रभू रामांच्या मूर्तीचा अभिषेक पौष महिन्याच्या बाराव्या दिवशी अभिजीत मुहूर्त, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवमशामध्ये होईल. ही शुभ वेळ 12:29 मिनिटे आणि 08 सेकंद ते 12:30 मिनिटे आणि 32 सेकंदांपर्यंत असेल. म्हणजेच प्राणप्रतिष्ठेची शुभ मुहूर्त 84 सेकंद असेल.
प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीचाच दिवस का?
सोमवार 22 जानेवारी रोजी शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. तसेच मंगळवार 23 जानेवारीला पहाटे 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे. परंतु 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटे आणि दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आलाय.