(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रासाठीची 125 रेल्वेची यादी कुठे आहे? रेल्वेमंत्र्यांचे रात्री 12 आणि 2 वाजता ट्वीट
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यास तयार, मजुरांची यादी द्या असं ट्वीट केलं. यानंतर ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे.
मुंबई : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेमंत्र्यांनी यानंतर रात्री सव्वा बारा अडकलेल्या मजुरांची यादी अद्याप मिळाली नसून लवकरात लवकर यादी पाठवावी असं म्हटलं. यानंतर त्यांनी सव्वा दोन वाजता ट्वीट करुन 125 गाड्यांची तयारी केली असताना आम्हाला फक्त 46 ट्रेन्सची यादी मिळाली असून त्यापैकी 41 ट्रेन सोडाव्या लागणार आहेत. कारण उर्वरित पाच ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओदिशाला जाणाऱ्या असून त्या अम्फान चक्रीवादळामुळे चालवू शकत नाही, असं पियुष गोयल म्हणाले.
पियुष गोयल यांचे सव्वा बारा आणि सव्वा दोन वाजता ट्वीट महाराष्ट्र सरकारने अजूनही यादी दिली नसल्याचं ट्वीटर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रात्री सव्वा बारा वाजता ट्वीट केलं होतं. ज्यात त्यांनी लिहिलं होतं की, "रात्रीचे 12 वाजले आहेत आणि पाच तासांनंतरही आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून उद्याच्या 125 ट्रेन्सची माहिती आणि प्रवाशांची यादी आलेली नाही. तरीही प्रतीक्षा करा आणि तयारी सुरु ठेवा, असा आदेश मी अधिकाऱ्यांना दिला आहे.
माझी सूचना आहे की, महाराष्ट्र सरकारने पुढच्या एक तासात किती ट्रेन, कुठेपर्यंत आणि प्रवाशांची यादी आम्हाला पाठवावी. आम्ही प्रतीक्षा करत आहोत आणि पूर्ण रात्र काम करुन उद्याच्या गाड्यांची तयारी करु. कृपया प्रवाशांची यादी पुढच्या एक तासात पाठवा."
यानंतर पुन्हा दोन तासांनी म्हणजेच रात्री सव्वा दोन वाजता रेल्वेमंत्र्यांनी आणखी एक ट्वीट केलं आणि लिहिलं की, "महाराष्ट्रातून सुटणाऱ्या 125 गाड्यांसाठी मजुरांची यादी कुठे आहे? दोन वाजेपर्यंत फक्त 46 ट्रेन्सची यादी मिळाली असून त्यापैकी पाच पश्चिम बंगाल आणि ओदिशाला जाणाऱ्या आहेत, परंतु अम्फान वादळामुळे त्या चालवल्या जाणार नाहीत. आम्ही 125 गाड्यांची तयारी केली असताना फक्त 41 ट्रेन सोडाव्या लागणार आहेत.
Where is the list for 125 trains from Maharashtra? As of 2am, received list of only 46 trains of which 5 are to West Bengal and Odisha which cannot operate due to cyclone Amphan.
We are notifying only 41 trains for today despite being prepared for 125 !!! — Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2020
सचिन सावंत यांची रेल्वेमंत्र्यांवर टीका पियुष गोयल यांनी तासाभरात मागितलेल्या यादीच्या ट्वीटवर काँग्रेस नेते सचिन सांवत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, "हे असे मंत्री आहेत जे मध्येच गायब असतात आणि अचानक प्रकट होतात. आश्चर्य या गोष्टीचं आहे की, मागील 25 दिवसांपासून मजुरांच्या तिकिटाचं ८५ टक्के भाडं माफ करण्याचा आपल्या विभागाचा आदेश जनतेलाच नाही तर उच्च न्यायालयाही सांगू शकले नाहीत आणि काही तासात यांना यादी हवी आहे."
रेल्वेमंत्र्यांनी ट्रेन आणि मजुरांची यादी मागितली असली तरी एका तासात ती पुरवणं व्यवहार्य नाही. कारण लॉकडाऊनमुळे सरकारी कामकाज अद्याप पूर्ण कर्मचाऱ्यांसह सुरु नाही. त्यात रेल्वेमंत्र्यांनी रात्री सव्वासात वाजता ट्वीट करुन मजुरांची यादी मागितली, यावेळी सरकारी कार्यालयंही बंद झालेली असतात. दरम्यान, रेल्वमंत्र्यांनी मागितलेली ट्रेन्स आणि मजुरांची यादी हे सोशल मीडियावर सुरु असलेल्या लॉकडाऊनमधल्या एखाद्या चॅलेंजप्रमाणे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये! रेल्वेमंत्र्यांच्या ट्विटला संजय राऊत यांचे उत्तरयह ऐसे मंत्री हे जो बीच में गायब रहते हैं। अचानक प्रकट होते हैं। आश्चर्य इस बात का है कि गये २५ दिनों से यह अपने विभाग का श्रमिकों के लिए ८५% रेल किराया माफ करने का आदेश जनता को ही नहीं पर उच्चतम न्यायालय को भी बता न पाए। और कुछ घंटों में इनको सूची चाहिए। https://t.co/4vDkZWpYVi
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 24, 2020
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? राज्याला उद्देशून साधलेल्या संवादात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. "आतापर्यंत 7 ते 8 लाख मजूरांना घरी पाठवलं, यासाठी कुठलं पॅकेज द्यायचं? असा सवाल करत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही. राज्यभरात गोरगरीब, मजूरांसह लाखो लोकांना मदत केली आहे. त्याची जाहिरात करायची का? आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी केंद्राकडे केली आहे. मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यांचा खर्च आम्ही करत आहोत. मात्र केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन उपलब्ध होत नाहीत," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
125 ट्रेन्स सोडण्यास तयार - रेल्वेमंत्री मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांची यादी द्या, असं पियुष गोयल यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे.
त्यांनी ट्वीट केलं की, "उद्धवजी आशा आहे तुम्ही ठीक असाल. तुमच्या स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्राला उद्यापासून रोज 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. महाराष्ट्रातील मजुरांची यादी तुमच्याकडे असल्याचं तुम्ही सांगितलं. तुम्ही ती यादी कृपया रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एका तासाच्या आत सादर करावी. यासोबतच ट्रेन कुठून सोडायची आहे, प्रवाशांनुसार ट्रेनची संख्या, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ही सर्व माहितीही द्यावी. यानुसार ट्रेन सोडण्याचे नियोजन आम्हाला करता येईल, असं पियुष गोयल म्हणाले. आशा आहे, ट्रेन स्टेशनवर आल्यावर आधीसारख्या रिकाम्या जाणार नाहीत. तुम्हाला जितक्या ट्रेन हव्या आहेत तेवढ्या उपलब्ध करून दिल्या जातील."
उम्मीद है कि पहले की तरह ट्रेन स्टेशन पर आने के बाद, वापिस ख़ाली ना जानी पड़े। आपको आश्वस्त करना चाहूँगा की आपको जितनी ट्रेन चाहिए वो उपलब्ध होंगी।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2020
CM Uddhav Thackeray | अडचणीच्यावेळी राजकारण करणं हे माझ्या संस्कृतीत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे