एक्स्प्लोर

Karnataka : बलात्काऱ्याला शिक्षा काय? कर्नाटकातील महिला आमदार म्हणाल्या- बलात्काऱ्याचे खच्चीकरण करा...

Karnataka : कर्नाटक विधानसभेत महिलांवरील वाढत्या अत्याचारावर चर्चा सुरु असताना महिला आमदारांनी यावर संताप व्यक्त केला. बलात्काऱ्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत अशीही मागणी केली. 

बंगळुरु : महाराष्ट्रातील साकीनाका, डोंबिवली असो वा कर्नाटकातील म्हैसुर असो, देशातील महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगारांना कायद्याची कोणतीही भीती राहिली नसून त्यामुळे महिलांच्या, अगदी अल्पवयीन मुलींच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच विषयावर कर्नाटक विधानसभेत चर्चा सुरु असताना महिला आमदारांच्या असंतोषाला वाचा फुटली. बलात्काऱ्याला कायद्याने सामान्य शिक्षा न देता त्याचे गुप्तांग छाटावे, त्याचे सार्वजनिकरित्या खच्चीकरण करावं, इतकंच नव्हे तर बलात्काऱ्याचे तेलंगणाच्या धर्तीवर एन्काऊंटर करावे अशी मागणी त्यांनी केली. 

म्हैसुरमध्ये नुकतंच एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. गेल्या 15 दिवसातील ही दुसरी बलात्काराची घटना आहे. त्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. याच विषयावर शुक्रवारी कर्नाटक विधानसभेमध्ये चर्चा सुरु झाली. 

महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आक्रमक भूमिका मांडणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर या मराठी भाषिक मतदारसंघाच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी या प्रश्नी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. त्या म्हणाल्या की, "स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराला स्त्रीलाच जबाबदार धरलं जातं आणि अत्याचार करणारा राजरोस ताठ मानेनं समाजात वावरतो. एक स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून आपण स्वत: बलात्कारीत महिला आणि मुलींचं दु:ख अनेकदा पाहिलं आहे. त्यामुळे बलात्काऱ्याला सामान्य शिक्षा न देता त्याचे गुप्तांग छाटावे, त्याला आयुष्यभर मानसिक त्रास होईल, त्याचे खच्चीकरण होईल अशी शिक्षा द्यावी."

आमदार डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या की, "सामान्य शिक्षेमुळे गुन्हेगारांवर फारसा परिणाम होत नाही. तो बलात्कारी व्यक्ती विना वेदना मरुन जाईल. त्यामुळे त्याचे गुप्तांग छाटावे. असं केल्यास त्या बलात्काऱ्याला रोज त्याच्या कृत्याची आठवण राहिल. पीडितेने अनुभवलेल्या वेदना त्यालाही अनुभवता येतील आणि त्याचे मानसिक खच्चीकरण होईल."

आमदार विनिशा नेरो म्हणाल्या की,  "बलात्काऱ्याचे पोस्टर्स सर्वत्र छळकायला हवेत, अशा लोकांची पोलिसांनी सार्वजनिक वरात काढली पाहिजे. त्यामुळे बलात्काऱ्याला थोडी तरी शरम वाटेल." 

मैसुरुचे आमदार एसआर महेश यांनी तेलंगणामध्ये घडलेल्या 2019 च्या बलात्काऱ्याच्या एन्काऊंटरचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, याच धर्तीवर कर्नाटकातील बलात्काऱ्यांचे एन्काऊंट करायला हवं. 

आमदार रुपा शशिधर म्हणाल्या की, "समाजाने महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. न्याय प्रक्रियेतील होणाऱ्या विलंबामुळे महिला त्यांच्यावर झालेल्या अत्याचाऱ्याची तक्रार द्यायला पुढे येत नाहीत."

देशातील विविध ठिकाणी महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे सोशल मीडियामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नि्र्माण झाला असून अत्याचाराच्या वाढत्या घटनांमधून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याचं स्पष्ट होतंय. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget