एक्स्प्लोर

कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही मात्र बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी एकी; चित्रा वाघ यांचा आरोप

राज्यात रोज कुठे ना कुठे महिला आणि मुलींवर अत्याचाराचं सत्र सुरु असून गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली नाही. संजय राठोड आणि मेहबूब शेखवर काही कारवाई होत नाही असं चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या.

मुंबई : डोंबिवलीमध्ये  एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचं काम सुरु असून कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही, मात्र बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी ते सर्व एकत्र येतात अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. डोंबिवली घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला असून यामध्ये 33 आरोपींचा समावेश असल्याचं स्पष्ट झालंय. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. 

भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, "डोंबिवलीची घटना ही कालचीच आहे. राज्यात रोज कुठे ना कुठे महिला आणि मुलींवर अत्याचाराचं सत्र सुरु आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली नाही. अशी घटना घडल्यानंतर सरकार त्या गुन्ह्याबद्दल काय भूमिका घेत हे महत्त्वाचं असत. पण बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष एकत्र येतात."

संजय राठोड आणि मेहबूब शेखवर कारवाई नाही 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "शिवसेनेचा नेता संजय राठोडवर अद्याप मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही. तर मेहबूब शेखवरही काहीही कारवाई होत नाही, त्याला अद्याप अटक केली नाही. गृहमंत्री राष्ट्रवादीचे, मेहबूब शेखही राष्ट्रवादीचा. सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून त्याला रॉयल ट्रीटमेंट देतात का?"

कोर्टाचे आभार मानते
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपण कोर्टाचे आभार मानत असल्याचं सांगत म्हणाल्या, "औरंगाबाद पोलिसांनी कोर्टात सादर केलेला बी समरी रिपोर्ट कोर्टाने फेटाळला आहे. पोलीस पीडितेसाठी काम करत नव्हते तर आरोपी मेहबूब शेखसाठी काम करत होते. पोलिसांनी पीडितेच्या घरी भेट देऊन तिची बदनामी करण्याचं काम केलं. आरोपी हा राजकीय माणूस असल्याने अस जाणूनबुजून असं करण्यात आलं. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं अशी आमची मागणी आहे.

पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे मेहबूब शेख याला अटक करावी आणि दीपक गिरी आणि निशिकांत भुजबळ या अधिकाऱ्यांच निलंबन करावं अशीही आपली मागणी असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. मुंबईच्या महापौर बोरिवलीला गेल्या. त्याच स्वागत करतो. पण तशाच त्या डोंबिवलीला का नाही गेल्या, त्या प्रकरणाची दखल घ्यावी वाटली नाही का असा सवालही चित्रा वाघ यांनी केला. 

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget