एक्स्प्लोर

Today In History : शोमॅन राज कपूर यांची जयंती, मानवाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले, आज इतिहासात

What Happened on December 14th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

What Happened on December 14th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 14 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी मानवाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. ध्रुवीय अन्वेषण क्षेत्रातील रोआल्ड अमुंडसेन यांनी 14 डिसेंबर 1911 रोजी प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले.  अ‍ॅमंडसेन यांनी जून 1910 मध्ये अंटार्क्टिकाला रवाना झाले आणि दीड वर्षांच्या प्रवासानंतर त्यांनी दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. आजच्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर 1924 रोजी अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांचा जन्म झाला. याबरोबरच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पूत्र संजय गांधी (Sanjay Gandhi) यांचा 14 डिसेंबर 1946 रोजी जन्म झाला. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

1903 : किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला पहिला प्रयत्न केला. 

विमानाचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक राईट बंधू  त्यांनी  14 डिसेंबर 1903 रोजी हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी चाचणी घेतली. अनेक अडचणींचा सामना करून 1905 मध्ये पहिले विमान तयार केले. 

1911 : मानवाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले

या दिवशी मानवाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. ध्रुवीय अन्वेषण क्षेत्रातील रोआल्ड अमुंडसेन यांनी 14 डिसेंबर 1911 रोजी प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले.  अ‍ॅमंडसेन यांनी जून 1910 मध्ये अंटार्क्टिकाला रवाना झाले आणि दीड वर्षांच्या प्रवासानंतर त्यांनी दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. 

1918 : पहिले योगगुरू बीके. एस अय्यंगार यांचा जन्म 

कर्नाटकातील बेल्लूर येथे जन्मलेल्या बीके. एस अय्यंगार यांना देशातील पहिले योगगुरू होण्याचा मान मिळाला आहे. त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1918 रोजी झाला. बीकेएस अय्यंगार वयाच्या 90 व्या वर्षीही योगासाठी वेळ काढत असत. ते दिवसातून तीन तास आसने आणि दर तासाला प्राणायाम करत असत. 200 हून अधिक शास्त्रीय योगासने आणि 14 प्रकारचे प्राणायाम करत असत. अय्यंगार यांचे वयाच्या 96 व्या वर्षी किडनीच्या दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले.

1924 : शोमॅन अभिनेते राज कपूर यांचा जन्म 

 हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते, शोमॅन राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी झाला. 1930 च्या दशकात बॉम्बे टॉकीजमध्ये क्लॅप बॉय बनलेल्या राज कपूर यांनी पृथ्वी थिएटरमधून वयाच्या दहाव्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनयाव्यतिरिक्त चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातही त्यांनी नाव कमावले. मेरा नाम जोकर, संगम, अनाड़ी, जिस देश में गंगा बहती है या सारखे अनेक चित्रपट त्यांनी दिले, बॉबी, राम तेरी गंगा मैली, प्रेम रोग सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.  1971 मध्ये पद्मभूषण आणि 1987 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 
 
1946 : संजय गांधी यांचा जन्म

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पूत्र संजय गांधी यांची आज जयंती आहे. 14 डिसेंबर 1946 रोजी त्यांचा जन्म झाला होता. वरुण गांधी हे त्यांचे पूत्र आहेत. गोरखपूरच्या वीर बहादूर सिंह यांना त्यांनी यूपीचे मुख्यमंत्री केले. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 

1972 :  अपोलो 17 यान परत आले

अमेरिकेने चंद्रावर पाठवलेले मानवयुक्त अंतराळ यान अपोलो 17 हे परत आले. या दिवशी अमेरिकेचे चंद्रवरील  शोध कार्य थांबवले.  

1977 : गीतकार, कवी, लेखक ग. दि. माडगूळकर यांचे निधन

कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात ग. दि. माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा – संवाद – गीतलेखनाचे काम केले. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. 14 डिसेंबर 1977 रोजी त्यांचे निधन झाले. 

1995 : डेटन करारावर स्वाक्षरी

बोस्निया, सर्बिया आणि क्रोएशिया यांनी पॅरिसमधील डेटन करारावर स्वाक्षरी केली आणि त्यांच्यातील तीन वर्षांचा संघर्ष संपवला.

2012 : अमेरिकेच्या कनेक्टिकटच्या न्यूटाऊनमध्ये हल्ला, 28 जणांचा मृत्यू

अमेरिकेत, कनेक्टिकटच्या न्यूटाऊनमध्ये झालेल्या गोळीबारात 28 जणांचा मृत्यू झाला.  

2013 : भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन 

भारतीय चित्रकार सी. एन. करुणाकरन यांचे 14 डिसेंबर 2013 रोजी निधन झाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 चा हफ्ता कधी मिळणार? Aditi Tatkare यांचं उत्तर ऐका..Mahayuti Cabinet Minister : शिरसाट ते राणे, मंत्रिपद मिळताच अनेकांकडून अधिकारी फैलावरTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 24 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
Embed widget