एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प. बंगालमध्ये दीदींची जादू, पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता
कोलकाता : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांचे कल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सत्ता टिकवली आहे. 294 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेसने 211 पेक्षाही जागांवर विजय मिळवला आहे.
प. बंगाल: तृणमूल काँग्रेस: 211, डावी आघाडी: 76, भाजप: 3, अन्य: 4
तर यावेळी सत्ता मिळवण्यात डाव्या आघाडीला अपयश आलं आहे. डावी आघाडी आणि काँग्रेसने एकत्र मिळून इथे निवडणूक लढवली. मात्र डाव्यांना 35, तर काँग्रेसला 31 म्हणजे दोघांना मिळून 66 जागांवरच आघाडी मिळवता आली. प. बंगालमध्ये भाजपपणे पहिल्यांदाच तुलनेने मोठं यश मिळवलं आहे. भाजपला 7 जागांवर बहुमत मिळवता आलं. एकंदरीत आतापर्यंतच्या निकालाच्या कलावरुन ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. आता केवळ अंतिम निकालाची प्रतिक्षा असून, कोण किती जागा मिळवतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.संबंधित बातम्या
हिमांता बिस्वा सरमा - आसाममध्ये भाजपला सत्तेवर आणणारा वझीर
पाच राज्यांचे सर्व निकाल एकाच ठिकाणी
प. बंगालमध्ये दीदींची जादू, पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता
तामिळनाडूत पुन्हा अम्मा, जयललिता यांना बहुमत
एन रंगासामी पुद्दुचेरीचा गड राखणार?
ABP RESULTS: भाजपसाठी आसाम का महत्त्वाचं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement