Durga Puja : दुर्गा पूजेला यूनेक्सोचा अमूर्त सांस्कृतिक वारसा दर्जा; कोलकात्यात आज महारॅलीचं आयोजन, UNESCO ची टीम उपस्थित
UNESCO : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दुर्गा पूजेला यूनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा दर्जा यादीत (Intangible Cultural Heritage of Humanity) स्थान मिळालं होतं.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजेला (Durga Puja) यूनेस्कोने (UNESCO) इन्टॅन्जिबल हेरिटेज साईट (Intangible Cultural Heritage of Humanity) म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये स्थान दिल्यानिमित्ताने आज कोलकात्यामध्ये (Kolkata) एक महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. दुर्गा पूजेला या यादीत स्थान मिळणं हे आपल्यासाठी गौरवाची गोष्ट असून त्यामुळे आपण यूनेस्कोचं आभार मानतो अशी प्रतिक्रिया देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) या महारॅलीचं आयोजन केलं आहे. या महारॅलीसाठी यूनेक्सोचे संचालक इरिक फाल्ट यांच्या नेतृत्वाखाली एक टीम आज कोलकात्यामध्ये पोहोचली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यासंबंधी बोलताना म्हणाल्या की, "दुर्गा पूजेला यूनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा असा दर्जा देणं ही आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. त्यासंबंधी धन्यवाद देण्यासाठी आपण कोलकात्यात एका महारॅलीचे आयोजन करत आहोत. यंदा दुर्गा पूजा एक महिना आधीच येत आहे. त्यामुळे दुर्गा पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल."
Durga Puja is an emotion that rises above parochial barriers and brings us together.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) September 1, 2022
It unites the magnificence of art with spirituality.
We thank @UNESCO for recognising Durga Puja as an intangible cultural heritage and honouring the labour of love of everyone involved. pic.twitter.com/waZSkPW5J3
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये पश्चिम बंगालमधील (West Bengal) दुर्गा पूजेची यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं. या यादीतील अमूर्त वारसा या प्रवर्गात दुर्गा पूजेचा समावेश करण्यात आला होता. त्यानिमित्ताने आज कोलकात्यामध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात येत आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार (Hindu Calender) दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये दुर्गा पूजा आयोजित केली जाते. दुर्गापूजा हा पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा उत्सव असून तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच बंगाली लोक जगभरात ज्या-ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी दुर्गा पूजा साजरा केला जातो.
दरवर्षी यूनेस्को जगभरातील दखल घेण्याजोग्या सांस्कृतिक परंपरा आणि कलांचा त्यांच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करते. आता दुर्गा पूजेचा या यादीत समावेश झाला आहे.
संबंधित बातमी :
Navratri 2021: बंगालच्या दुर्गापूजेची कहाणी... कुणी सुरू केला महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव?