एक्स्प्लोर

West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?

बंगालमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहता सरकारी 92 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे दिसून येते.

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर आता एक्झिट पोलमधून (West bengal Exit Poll) राज्यात कोणाची सत्ता येणार, कोण होणार पश्चिम बंगालचा किंग, ममता दीदी (Mamata banerjee) गड राखणार की मोदींच्या नेतृत्वात भाजपचं कमळ खुलणार याची आकडेवारी समोर आली आहे. विविध एजन्सीच्या एक्झिट पोल आकडेवारीतून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. त्यामध्ये, दीदींचा झटका बसणार असून वाढीव मतदानाचा फायदा भाजपला होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार स्थापन होईल. तर, पोल डायरीच्या आकडेवारीनुसार देखील भाजप बहुमताचा आकडा गाठत असल्याचं दिसून येत आहे. 

बंगालमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहता सरकारी 92 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे दिसून येते. त्याच पार्श्वभूमीवर आलेल्या एक्झिट पोलमधून ममता बॅनर्जींच्या 20 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, भाजप बहुमताचा आकडा पार करू शकते, प. बंगालमधील 294 जागांपैकी 146 ते 161 जागांवर भाजपला विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर, ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागांवरच थांबावे लागणार असल्याचं दिसून येते. तर, काँग्रेससह डाव्या विचारसरणीच्या पक्षांना मिळून अवघ्या 6 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल, असा एक्झिट पोल आहे. आता, पोल डायरीचीही आकडेवारी समोर आली असून भाजपलाच बहुमत मिळत असल्याचा अंदाज आहे. 

पोल डायरीची आकडेवारी

पोल डायरीच्या आकडेवारीनुसार प. बंगालमध्ये 294 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला 142 ते 171 जागा मिळू शकतात, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) 99 ते 127 जागांवर विजय प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतराचा अंदाज वर्तवला जात असून मोठा फेरबदल राज्यात पाहायला मिळू शकतो. मतांच्या टक्केवारीकडे पाहिल्यास भाजपला सुमारे 45.87% मते मिळण्याचा अंदाज आहे, तर TMC चा मतांचा वाटा 40.32% इतका राहू शकतो. काँग्रेसला 3 ते 5 जागा आणि सुमारे 4.59% मते मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. डाव्या आघाडीला (Left Front) 2 ते 3 जागा आणि सुमारे 7.47% मतांचा वाटा मिळू शकतो. इतर पक्षांना अत्यल्प म्हणजे 0 ते 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

2021 मधील अंदाज ठरला फोल

दरम्यान, 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचाही अंदाज पोल डायरी या संस्थेनं वर्तवला होता. त्यामध्ये, भाजपला 148 ते 187 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, गत निवडणुकीत भाजपला 77 जागांवरच समाधान मानावे लागले होते. तर, ममता बॅनर्जींनी 215 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला होता. 

हेही वाचा

पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget