National Girl Child Day 2022 : आज राष्ट्रीय बालिका दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व
National Girl Child Day : आज देशात राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जाणार आहे.
National Girl Child Day : भारतात दर वर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. यावर्षी भारतात 14 वा राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जाणार आहे. देशातील बालिकांना त्यांच्या आधिकारांनाबाबत जागृक करणे हा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. राष्ट्रीय बालिका दिवस हा बालिकांना शिक्षा, स्वास्थ्य आणि रोजगार या गोष्टींबाबत जागरूक करतो. दर वर्षी राष्ट्रीय बालिका दिनाची थिम वेगवेगळी असते. जाणून घेऊयात राष्ट्रीय बालिका दिन या दिवसाबाबत खास गोष्टी...
राष्ट्रीय बालिका दिन का साजरा केला जातो?
राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचा उद्देश भारतातील मुलींना आधार आणि संधी प्रदान करणे हा आहे. मुलींना त्यांच्या हक्कांबद्दल आणि शिक्षणाबद्दल जागृक करणे तसेच आरोग्य आणि पोषण याबद्दल जागरूकता वाढवणे हा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. स्त्री भ्रूणहत्या आणि लैंगिक असमानता ते लैंगिक शोषण या सर्व मुद्द्यांवर मुली आणि लोकांना जागरूक करण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.
राष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास
भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन पहिल्यांदा 24 जानेवारी 2008 रोजी साजरा करण्यात आला होता. राष्ट्रीय बालिका दिनाची सुरूवात महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केली. इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.म्हणून भारतीय इतिहास, महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून निवडला गेला.
राष्ट्रीय बालिका दिनची यावर्षीची खास थिम
बालिका दिन 2021 ची थीम 'डिजिटल जनरेशन, आमची जनरेशन' होती. बालिका दिन 2020 ची थीम 'माझा आवाज, आमचे सामायिक भविष्य' होती. यावर्षीच्या थिमची अजून घोषणा झालेली नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट, राज्यात शाळा कुठे सुरु, कुठे बंद; वाचा सविस्तर
PM Modi : पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद, देशभरातील 29 बालकांचा सन्मान
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha