काळाचा घाला! वीज कोसळून 2 शाळकरी मुलांसह 11 जणांचा मृत्यू, प. बंगाल हळहळलं
Lightning in West Bengal : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू झालाय. मालदा जिल्ह्यात वीज कोसळून मृत्यू झालेल्यांमध्ये 2 शाळकरी मुलांचाही समावेश आहे.
Lightning in West Bengal : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मालदा (Malda) जिल्ह्यात वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू झालाय. मालदा जिल्ह्यात वीज कोसळून मृत्यू झालेल्यांमध्ये 2 शाळकरी मुलांचाही समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यानंतर अनेक ठिकाणी वीज कोसळलेलीही पाहायला मिळाली. ज्यामध्ये आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
मालदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किती जणांचा मृत्यू?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मृतांपैकी तीन जण जुना मालदा पोलीस ठाण्याच्या सहापूर भागातील आहेत. इतर दोघे घरे गाढोळे पोलिस ठाण्याच्या अदिना आणि रतुआ पोलिस ठाण्याच्या बाळूपूर भागातील राहिवासी आहेत. उर्वरित हरिश्चंद्रपूर आणि अंग्रेज बाजारठाण भागातील आहेत. पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी मृतदेह मालदा मेडिकल कॉलेजच्या शवागारात आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
वीज कोसळून मृत्यू झालेल्यांची नावे -
चंदन सहानी (वय 40), राज मृधा (16), मनोजित मंडल (21), असित साहा (19), सुमित्रा मंडल (46), पंकज मंडल (23) नयन रॉय (23), प्रियांका सिंग रॉय (20), राणा शेख (8), अतुल मंडल (65) आणि सबरूल शेख (11) अशी वीज कोसळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हरिश्चंद्रपूर येथील नयन रॉय आणि प्रियांका रॉय या दाम्पत्याचा तागाची लागवड करताना वीज पडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 8 आणि 11 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पोलीस ठाण्याच्या हडाटोला परिसरातील ते राहिवासी आहेत.
West Bengal CM Mamata Banerjee tweets, "My heart goes out to the families who lost their loved ones in Malda due to the tragic lightning strikes. I extend my deepest condolences to them during this difficult time. My thoughts and prayers are with the injured, and I pray for their… pic.twitter.com/aQKfqjVCjY
— ANI (@ANI) May 16, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
Chhagan Bhujbal on Raj Thackeray : तुम्ही तर रक्ताचे होतात, इकडं पण असता तिकडं पण असता, बाळासाहेबांशी असे का वागलात? छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल