Monsoon : मोठी बातमी! यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज
यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
Monsoon 2023 : यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस (Rain) होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे. आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दिर्घकालीन अंदाज आहे.
देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 835 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटलं जातं. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
2023 दक्षिण-पश्चिम मानसून वर्षा के लिए पूर्वानुमान: मात्रात्मक रुप से मानसून ऋतु (जून से सितम्बर) वर्षा ± 5% मॉडल त्रुटि के साथ दीर्घावधि औसत (एलपीए) का 96% (सामान्य)होने की संभावना है । 1971-2020 की अवधि के लिए पूरे देश में ऋतुनिष्ठ वर्षा का दीर्घावधि औसत (LPA) 87 सेंमी. है| pic.twitter.com/vbzyOKIT8V
— India Meteorological Department (@Indiametdept) April 11, 2023
पाऊस मोजण्याची श्रेणी कशी ठरते?
यंदाच्या हंगामात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकीत करण्यात आले आहे.
वातावरणातील स्थितीच्या आधारावर अंदाज
सध्या वर्तवण्यात आलेला दीर्घकालीन अंदाज एप्रिलच्या सुरुवातीला असलेल्या वातावरणातील स्थितीच्या आधारावर देण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी अलीकडच्या काळात अत्याधुनिक प्रारूपे तयार करण्यात आली आहेत. त्यात वाऱ्यांची दिशा, अवकाश, समुद्राची स्थिती आदींचा सातत्याने अभ्यास केला जातो. त्यासाठी हवामान केंद्रांसह उपग्रह, रडार यंत्रणा यांचा आधार घेतला जातो. हंगामाच्या कालावधीत ही स्थिती कशी राहील, याचा अंदाज प्रारुपांच्या आधारे मांडला जातो आणि त्यावरुन त्या काळातील हवामानाची आणि पावसाची भाकिते केली जातात
महत्त्वाच्या बातम्या: