एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राम मंदिरासाठी कोणतीही तडजोड नाही : आरएसएस
राम मंदिराच्या निर्माणासाठी आता कोणतीही तडजोड चालणार नाही, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला आहे.
मुंबई : राम मंदिराच्या निर्माणासाठी आता कोणतीही तडजोड चालणार नाही, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी घेतला आहे. रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका विराट हिंदू सभेमध्ये ते बोलत होते. मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज राम मंदिराच्या मागणीसाठी हजर होते.
यावेळी होसबळे म्हणाले की, सरकारने राम मंदिरासाठी त्वरित अध्यादेश काढावा, त्यानंतर पुढच्या क्षणी राम मंदिर उभारणीचे काम सुरु होईल. यावेळी त्यांनी गुजरातमधील नर्मदा नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्यावर टीका केली आहे.
दरम्यान या धर्मसभेला जगद्गुरु रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्र आचार्य महाराज, श्री श्री 1008 महामंडलेश्वर, आनंद गिरी महाराज, गोविंद देवगिरी महाराज उपस्थित होते. या वेळी सगळ्यांनीच राम मंदिराच्या उभारणीचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी मांडली.
अयोध्या जमीन वादावर जानेवारी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. परंतु त्यापूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशातले वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीदेखील राम मंदिरासाठी कायदा करण्याची मागणी मांडली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
लाईफस्टाईल
निवडणूक
Advertisement