एक्स्प्लोर

आमचं काम लक्ष्य भेदणं, मृतदेह मोजण्याचं नाही : वायू दल प्रमुख

एअर स्ट्राईकनंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत वायू दलाचे प्रमुख बी एस धनोआ बोलत होते.

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारतीय वायू दलाने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. "वायूसेनेचं काम लक्ष्य भेदणं हे असतं. तिथे किती नुकसान झालं हे आम्ही मोजत नाही," असं एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी सांगितलं. तसंच "आम्हाला जे काही टार्गेट मिळतं आम्ही केवळ तेच उद्ध्वस्त करतो. मृतांचा आकडा नेमका किती आहे, याची माहिती सरकारच देऊ शकतं," असंही त्यांनी स्पष्ट केलं. एअर स्ट्राईकनंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत वायू दलाचे प्रमुख बी एस धनोआ बोलत होते. बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर पाकिस्तान आणि काँग्रेसने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज वायू दलाने पत्रकार परिषद घेतली आणि बॉम्ब टार्गेटवरच टाकल्याचं म्हणाले. "जर आम्ही योग्य टार्गेट भेदले नाहीत आणि केवळ जंगलातच बॉम्ब पाडले तर पाकिस्तानने उत्तर का दिलं?," असं धनोआ म्हणाले. वायू दलाने यशस्वीरित्या लक्ष्याला भेदलं असं नमूद करत पाकिस्तानच्या F16 विमानांना उद्ध्वस्त करण्यासाठी MIG21 बायसेनचा वापर का केला याचं कारणंही धनोआ यांनी यावेळी सांगितलं. "MIG21 आमचं कामगार विमान असून ते अपग्रेड केलं आहे. या विमानाचं रडार उत्तम आहे. आमच्या ताफ्यात जेवढे विमान आहेत, ते लढाईत वापरतात. आमचं ऑपरेशन अजूनही सुरु आहे, यासाठी आम्ही सगळ्यांसमोर ही बाब सांगू शकत नाही," असं बीएस धानोआ यांनी स्पष्ट केलं. तसंच पाकिस्तानचं विमान उद्ध्वस्त करणारे विंग कमांडर अभिनंदन वर्थमन यांच्याबाबत विचारलं असता धानोआ म्हणाले की, "अजून त्यांच्या फिटनेस चाचणी सुरु आहे, जर ते फिट असतील, तर पुन्हा लढाऊ विमान उडवू शकतात." 40 जवान शहीद आणि एअर स्ट्राईक 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतीय वायूदलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करुन जैश-ए-मोहम्मदचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते. संबंधित बातम्या मसूद अजहर जिंदा है : पाकिस्तानी मीडियाचा दावा

भारताच्या हवाई हल्ल्यात 'जैश'चं मोठं नुकसान, मसूदच्या भावाची कबुली, मात्र पाकिस्तानी लष्कराला अमान्य

भारतीय समजून पाकिस्तानी लोकांनी त्यांच्याच पायलटला मारले

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget