एक्स्प्लोर

नोटाबंदीचा हेतू साध्य, आकडेवारीनंतर जेटलींचा दावा

जे उद्देश समोर ठेवून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता, तो उद्देश साध्य झाला, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच किती पैसा जमा झाला, याची आकडेवारी जाहीर केली. नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. तर 1000 च्या नोटांमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपयेच जमा झाले, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. नोटाबंदीचा उद्देश हा पैसा जमा करणं नव्हता, तर कर वाढवणं, दहशतवाद, नक्षलवाद रोखणं, नगदी व्यवहार कमी करणं, डिजिटायझेशन करणं आणि काळा पैसा रोखणं हा होता आणि यामध्ये बदल झाला आहे, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. आरबीआयने आकडेवारी जाहीर केल्यानंतर जेटलींनी पत्रकार परिषदेद्वारे याबाबत माहिती दिली. नगदी व्यवहार कमी करणं हा नोटाबंदीचा हेतू होता. नोटाबंदीनंतर आतापर्यंत नगदी व्यवहार जवळपास 17 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे नोटाबंदीचा उद्देश साध्य झाला आहे. भविष्यातही या निर्णयाचा फायदा होईल. आता भविष्यात निवडणुकांमधील काळा पैसा रोखणं हे सरकारचं उद्दीष्ट असल्याचंही जेटलींनी सांगितलं. बँकांमध्ये पैसा जमा करणं हा नोटाबंदीचा उद्देश होता, अशी टीका केली जात आहे. मात्र ज्यांना काळा पैसा कसा रोखायचा याबाबत माहिती नाही, त्यांच्याकडूनच अशी टीका केली जात असल्याचं जेटली म्हणाले. नोटाबंदीमुळे नगदी व्यवहार कमी झाले आणि नोटांचं प्रमाणही कमी झालं. त्यामुळे छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवाया आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण कमी झाल्याचा दावा जेटलींनी केला. नोटाबंदीची आकडेवारी आरबीआयने वार्षिक आर्थिक अहवालात नोटाबंदीबाबत माहिती दिली आहे. या अहवालात मार्च 2017 पर्यंतची आकडेवारी देण्यात आली. 1000 रुपयांच्या जवळपास 99 टक्के नोटा परत आल्या आहेत. एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. नोटा छपाईचा खर्च वाढला दरम्यान नोटा छपाईचा खर्चही या आर्थिक वर्षात दुप्पट झाल्याची माहिती आरबीआयने दिली. 2016-17 या वर्षात नोटा छपाईचा खर्च 7 हजार 965 कोटी रुपये झाला आहे, जो 2015-16 या वर्षात 3 हजार 421 कोटी रुपये एवढा होता. नोटाबंदीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. त्यानंतर 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात आणल्या. नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बँकेत जमा करण्यात आल्या. ज्याची आकडेवारी आरबीआयने जवळपास दहा महिन्यांनी जाहीर केली आहे. आरबीआयचा आर्थिक अहवाल काय सांगतो?
  • नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले
  • एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही.
  • 500 रुपयांच्या जुन्या नोटेमध्ये 7 हजार 100 कोटी रुपये परत आले नाही आणि उर्वरित नोटा बनावट आणि फाटलेल्या होत्या.
  • एकूण 16 हजार कोटी रुपये परत आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget