एक्स्प्लोर
‘विहिंप’च्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे यांची वर्णी
विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला आहे. कारण आज पार पडलेल्या निवडणुकीत विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे विजयी झाले आहेत.
![‘विहिंप’च्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे यांची वर्णी vishnu sadashiv kokaje elected as new chairman of vishwa hindu parishad latest marathi news updates ‘विहिंप’च्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे यांची वर्णी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/14170945/pravin-togdiya-and-sadashiv-kokaje.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला आहे. कारण आज पार पडलेल्या निवडणुकीत विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे विजयी झाले आहेत.
विष्णू सदाशिव कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत.
तब्बल 52 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत आज कोकजे 131 मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण 273 प्रतिनिधींपैकी 192 प्रतिनिधींनी मतदान केलं. या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा पराभव झाला आहे.
गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे भाजप आणि तोगडिया यांच्यातील संबंध दुरावल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे तोगडिया यांना पदावरुन हटवण्यासाठीच ही निवडणूक झाल्याचं बोललं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)