(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर देसी जुगाड, नेटकरीही हैराण
काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सलग वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर व्हायरल होणारा देसी जुगाड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई : 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्वीट केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये देशी जुगाड करुन एक वाहन तयार केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंटचाही वर्षाव केला जात आहे. तसेच अनेकांनी कमेंट करुन सरकारवरही निशाणा साधला आहे.
आयएएस अधिकाऱ्याने शेअर केलेला व्हिडीओ :
ठाठ.???????? pic.twitter.com/j3FSd5XZWz
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 4, 2021
काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सलग वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं होणारी वाढ सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सोशल मीडिया युजर्सही पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या दरांमुळे केंद्र सरकारवर सातत्यानं निशाणा साधत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे चिंतातूर असणाऱ्या युजर्सच्या भावना मांडणाराच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओ दक्षिण भारतातील असल्याचं सांगितलं जात आहे.
सुरुवातीला तुम्ही व्हिडीओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, एखाद्या कारचा व्हिडीओ असल्याचा भास होतो. त्या कारच्या मागच्या सीटवर एक व्यक्ती शांततेत बसल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर दुसऱ्या दाराने आणखी एक व्यक्ती त्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर बाहेर उभे असलेल्या व्यक्ती त्यांना बाय करतात. पण जसा व्हिडीओ पुढे पुढे जातो, त्यातून खुलासा होतो की, ही कार नसून ही एक बैलगाडी आहे.
ही बैलगाडी आहे की, कार?
गाडीमध्ये कारच्या पुढच्या भागाचा वापर केलेला नाही. त्याऐवजी तिकडे दोन बैल बांधले असून त्यामार्फत ही गाडी चालते. पुढे ड्रायव्हर बैलं हाकून गाडी चालवत आहे. व्हिडीओवर कमेंट करताना युजर्सनी ही गाडी पर्यावरण पूरक असल्याचं म्हटलं आहे. तसेच अनेकांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींमध्ये ही गाडीच आता आपलं भविष्य असल्याचं म्हटलं आहे.
सर आज अगर मनमोहन की सरकार होती तो पेट्रोल 44रू प्रति लीटर होता। पर जिस रफ़्तार से पेट्रोल की क़ीमत बेक़ाबू है, ये आम हो जायेगा ग्रामीण क्षेत्रों में ।
— Sunil K Chaturvedi (@advskchaturvedi) February 5, 2021
सुनील चतुर्वेदी नावाच्या एका ट्विटर युजरने तर या व्हिडीओवर कमेंच करताना थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. युजरनं म्हटलं आहे की, "जर आज मनमोहन सिंह यांचं सरकार असतं, तर पेट्रोलची किंमत 44 रुपये असती. परंतु, ज्या वेगाने इंधनाचे दर अवाक्याबाहेर जात आहेत. त्यावरुन असं दिसत आहे की, व्हिडीओतील दृष्य सगळीकडेच पाहायला मिळेल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Viral Video | हटके पण आगळी-वेगळी; श्रीलंकेच्या गोलंदाजाची भन्नाट स्टाईल