एक्स्प्लोर
देशभरात संतापाची लाट पसरवणाऱ्या व्हायरल व्हिडीओचं सत्य
नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन दहा दिवस झाले आहेत. मात्र दहा दिवसांनंतरही देश रांगेत आहे. पण जर तुम्हाला समजलं की, ज्या बँकेच्या रांगेत तुम्ही अनेक तास उभे आहात, त्याच बँकेच्या मागील चोर खिडकीतून नव्या नोटांचं लपून छपून वाटप सुरु असेल तर तुम्हाला कसं वाटेल? असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा आहे. बँक खिडकीतून होणाऱ्या पैशांच्या वाटपाचं व्हायरल सत्य काय हे जाणून घेऊया.
व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेला हा 12 सेकंदांचा व्हिडीओ पाहून लोकांचा संताप होत आहे. लोकांची प्रतिक्रिया योग्य आहे. कारण देशाच्या कानाकोपऱ्यात सरकारी बँकांपासून खासगी बँकांच्या रांगेत तुम्ही तासन् तास उभे आहात. पण त्याच बँकेच्या चोर खिडकीतून नव्या नोटा लपून छपून अशा व्यक्तीला दिल्या जात आहे, जो रांगेत उभाच नाही.
त्यामुळेच हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर तुफान व्हायरल होत आहे. फक्त 12 सेकांदांच्या हा व्हिडीओत व्यवस्थेच्या अक्षरश: चिंधड्या उडताना दिसत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती बँकेच्या खिडकीबाहेर वाट पाहताना उभा आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी आधीपासूनच ठरलेल्या आहेत, फक्त पैसे मिळण्याची प्रतीक्षा होती. बँकेची खिडकी उघडी आहे. पण खिडकीजवळ कोणीही दिसत नाही.
बाईकवर बसलेला हा व्यक्ती आणि त्याच्या शेजारी उभा असलेला दुसरा व्यक्ती बँकेच्या खिडकीकडे डोळे लावून बसले आहेत. खिडकीजवळ जसं कोणीतरी येताना दिसलं, तसं तिथे उभा असलेला व्यक्ती तात्काळ खिडकीजवळ जातो, वर चढतो आणि बँकेच्या आतून नोटांचं बंडल बाहेर येताना दिसतं. हा व्यक्ती नोटांचं बंडल हातात घेतो आणि ते खिशात घालून तिथून निघूनही जातो.
तिथे आणखीही लोक उभे आहेत. दोन वृद्ध बसलेले आहेत. पण तिथेच असलेल्या एकाने हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. जसा हा व्हिडीओ शेअर झाला, तसा तो अधिकच चर्चेत आला.
खरंच, बँकेच्या चोर खिडकीतून नोटा बदलल्या जात आहेत? बँकेतून नव्या नोटांचं लपून छपून वाटप होत आहे? ह्या व्हिडीओचं सत्य काय आहे?, असे प्रश्न व्हिडीओ शेअर करणारे लोक विचारत आहेत.
या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी 'एबीपी माझा'चं संलग्न चॅनल 'एबीपी न्यूज'ने व्हायरल व्हिडीओची पडताळणी केली. हा व्हिडीओ नीट पाहिल्यावर समजलं की, त्यावर पंजाब नॅशनल बँकेचं बोर्ड आहे. पण हा व्हिडीओ देशातील कोणत्या शहरातील, कोणत्या भागातील आहे, हे समजणं कठीण होतं. मात्र याच व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या बाईकच्या नंबर प्लेटवर डीएल लिहिलं होतं. म्हणजेच ही गाडी दिल्लीतील आहे आणि व्हिडीओ पण देशाची राजधानी दिल्लीतला आहे.
दोन गोष्टी तर स्पष्ट झाल्या होत्या. पहिली म्हणजे देशासोबत गद्दारी होत असल्याचा हा व्हिडीओ दिल्लीतील आहे. दुसरी म्हणजे हा प्रकार पँजाब नॅशनल बँकेतील आहे. गुरुवारी दुपारी हा व्हिडीओ 'एबीपी न्यूज'कडे पोहोचला होता. संध्याकाळपर्यंत स्पष्ट झालं की हा व्हिडीओ दिल्लीच्या मॉडल टाऊनमधील आहे.
'एबीपी न्यूज'चे प्रतिनिधी दिलीप बुंदवाला यांनी दिल्लीच्या मॉडल टाऊनमध्ये पंजाब नॅशनल बँक शोधून काढली. त्यांच्या पडताळणीत बँकही सापडली आणि ती चोर खिडकीही. 12 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये केवळ एकच घटना कैद झाली आहे. पण दिवसभरात या चोर खिडकीतून नव्या नोटांची किती बंडलं कुठे कुठे जात असतील या विचार न केलेलाच बरा?
या बँकेबाहेर मोठ मोठ्या रांगा होत्या. 'एबीपी न्यूज'च्या प्रतिनिधींनी रांगेतील लोकांशी संवाद साधला. या लोकांनीही हा व्हिडीओ पाहिला होता, पण त्यामधील व्यक्तीला कोणीही ओळखत नाही. पण व्हिडीओ पाहिल्यावर त्यांचाही प्रचंड संताप झाला.
जेवढी गर्दी बँकेच्या बाहेर होती, तेवढीच आतही होती. 'एबीपी न्यूज'च्या प्रतिनिधींनी बँक मॅनेजरशी व्हायरल व्हिडीओ आणि बँकेच्या चोर खिडकीबाबत काय माहिती आहे, अशी विचारणा केली. मात्र तपास सुरु आहे, असं उत्तर मॅनेजरने दिलं.
दिल्लीतील पंजाब नॅशनल बँकेच्या मॉडल टाऊन 3 च्या शाखेने आरोपी हेड क्लर्क अनिलला निलंबित करुन चौकशीचे आदेशही दिले आहेत. हे संपूर्ण प्रकरण गुरुवारचं आहे. चोर खिडकीतून 100 च्या नोटा असलेली दहा हजारांची रोकडही देण्यात आली.
'एबीपी न्यूज'च्या पडताळणीत हा व्हायरल व्हिडीओ खरा असल्याचं सिद्ध झालं आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement