एक्स्प्लोर
एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस सुरु झाला आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच काळ्या पैशांवरुन सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी आली आहे. सोशल मीडियावरील काही हटके मेसेज ''विवाहित पुरूषांसाठी खूशखबर... ज्या बायकांनी नवऱ्यापासून पैसे लपवून (500, 1000 च्या नोटा) ठेवले आहेत त्यांचेही काळे धन आता बाहेर निघणार'' ''आज भारतात पहिल्यांदा गरिब हसत आहे आणि श्रीमंत रडत आहे'' ''हे वर्ष भारीच, देवाने सगळेच ऐकले.. येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा'' ''पुणेरी लग्न पत्रिका, कृपया आहेराच्या पाकिटात 500, 1000 च्या नोटा खपवू नये'' ''पोलीस : लायसन्स आहे का ? मी : नाही पोलिस : 100 ची पावती करावी लागेल मी : 500 घ्या सोडून द्या'' ''नोकर वर्ग... पगार झाल्यावर 100 च्या नोटांनी खिसा अगदी गच्च भरेल फिलींग ऑसम'' ''पुणेरी पाटी... येथे हजार पाचशेच्या नोटांची रद्दी घेतली जाईल..'' ''आज ज्यांना शांत झोप लागणार तेच सर्वात श्रीमंत'' संबंधित बातमी :
पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी काय कराल?
500 आणि 100 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























