एक्स्प्लोर
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी टोळी गजाआड
आंध्र प्रदेश पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
विजयवाडा : आंध्र प्रदेश पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या या कारवाईत ही टोळी एक Voip (voice internet protocol) एक्सचेंज चालवत असल्याचं उघड झालं असून, या टोळीकडून अनेक कंपन्यांचे सिमकार्ड आणि डिव्हायस जप्त केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील मिलिट्री इंटेलिजेंसच्या एका यूनिटला या एक्सचेंजचा सुगावा लागला होता. या एक्सचेंजच्या माध्यमातून, लष्कराची माहिती मिळवण्यासाठी विविध नंबरवरुन कॉल केले जात होते.
लष्कराच्या सूचनेनंतर पोलिसांनी छापेमारी करुन, या टोळीचा पर्दाफाश केला. या छापेमारीत पोलिसांनी 6 Simbox, बेकायदेशीर पणे मिळवलेले 230 सिमकार्ड आणि लॅपटॉप आदीसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या टोळीचे नेटवर्क तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकपर्यंत पसरलेलं आहे.
काय आहे Simbox एक्सचेंज?
या बॉक्सच्या माध्यमातून परदेशात बसलेली व्यक्ती आपला मोबाईल नंबर जाहीर न करता, भारतात कॉल करु शकते. हा कॉलदरम्यान ज्याला फोन केला आहे, त्या व्यक्तीच्या मोबाईलवर तो नंबर भारतीयच असल्याचं दाखवतं. त्यामुळे कॉल करणारा व्यक्ती परदेशातून फोन करत आहे, हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही.
याच तंत्रज्ञानाचा फायदा घेत पाकिस्तानातील इंटेलीजेंस्ट ऑपरेटिव्ह संघटना भारतीय लष्कराची आणि सुरक्षा रक्षकांना कॉल करुन, माहिती गोळा करण्याचा प्रयत्न होत असे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement