Savarkar Death Anniversary : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांमधून तरुणांना मिळते प्रेरणा, देशप्रेमाची भावना होते जागृत; वाचा त्यांचे विचार
Veer Savarkar Death Anniversary : जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा होते. आजही ते आणि त्यांचे विचार तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे.
Vinayak Damodar Savarkar Quotes in Marathi : सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांची आज पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर एक स्वातंत्र्यसेनानी तर होतेच त्यासोबतच लेखकही होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) जन्म नाशिकच्या (Nashik) भगुर येथे झाला. स्वातंत्र्यासाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही. हे ठासून सांगणारे सावरकर नाशिकसह देशाचं भूषण आहेत. जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे सावरकर स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा होते. आजही ते आणि त्यांचे विचार तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर हिंदुत्त्ववादी होते. त्यांना 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक आणि पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली. लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेताना जोसेफ मॅझिनी या इटालियन विचारवंताच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर सावरकरांनी केले. भाषांतराला सावरकरांनी दिलेली प्रस्तावना भारतीयांसाठी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान ठरली. त्या काळी अनेक क्रांतीकारकांना ही प्रस्तावना पाठ होती. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले म्हणून सावरकर यांची बॅरिस्टर पदवी काढून घेण्यात आली.
सावरकर हे भाषाकारही होते. भाषा शुद्धीकरणासाठी सावरकरांनी मोठं काम केलं आहे. मराठी भाषेला दिनांक, महापौर असे 45 मराठी शब्द त्यांनी दिले. विनायक दामोदर सावरकर यांनी 83व्या वर्षी 1 फेब्रुवारी 1966 पासून अन्न, औषध, पाणी या सर्वांचा त्याग केला. हळूहळू त्यांची प्रकृती खालावली आणि 26 फेब्रुवारी 1966 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भगूर येथे सावरकरांचे स्मारक आहे. 'ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातील सुवर्णपान आहे.
Veer Savarkar Thoughts in Marathi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार
1. हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण : स्वातंत्र्यवीर सावरकर
2. अनादी मी आणि अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु जगती असा कवण जन्माला : स्वातंत्र्यवीर सावरकर
3. कष्टच तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते : स्वातंत्र्यवीर सावरकर
4. जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही : स्वातंत्र्यवीर सावरकर
5. (देशहित जपताना) या जगात देवही माणसांच्या तोंडून येणाऱ्या प्रार्थनापेक्षा तोफांच्या तोंडातुन येणाऱ्या प्रार्थनांकडे जास्त लक्ष देतो : स्वातंत्र्यवीर सावरकर
6. पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास आवश्यक आहे : स्वातंत्र्यवीर सावरकर
7. आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके शब्द तरी शाब्दिक बौद्धिक राष्ट्रीय नि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करत राहिले पाहिजे : स्वातंत्र्यवीर सावरकर
8. मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहेत : स्वातंत्र्यवीर सावरकर
9. आपल्या प्रामाणिकपणाचा वापर होईल पण केव्हा, तर दुसऱ्यास प्रामाणिक बनविण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच : स्वातंत्र्यवीर सावरकर
10. उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही : स्वातंत्र्यवीर सावरकर
महत्वाच्या इतर बातम्या :
Balakot Airstrike : बालाकोट एअर स्ट्राईकला चार वर्ष पूर्ण, 'असा' घेतला पुलवामा हल्ल्याचा बदला