Balakot Airstrike : बालाकोट एअर स्ट्राईकला चार वर्ष पूर्ण, 'असा' घेतला पुलवामा हल्ल्याचा बदला
Balakot Air Strike : 26 फेब्रुवारी 2019 च्या रात्री भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पस् उद्ध्वस्त केले आणि पुलवामान हल्ल्याचा बदला घेतला.
Balakot Air Strike : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून पुलवामा हल्ल्याचा (Pulwama Attack) बदला घेतला. 1971 च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धानंतर पहिल्यांदा भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक (बालाकोट) करण्यात आला. बालाकोट हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच थरकाप उडाला होता. आज बालाकोट एअरस्ट्राईकला चार वर्ष पूर्ण होत आहेत. जम्मू काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीहा एअर स्ट्राईक केला. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेत भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेतला.
Balakot Air Strike : 'असा' झाला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक
26 फेब्रुवारी 2019 च्या रात्री जवळपास साडे तीन वाजता भारतीय हवाई दलाने भारतातून 12 मिराज 2000 लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानात प्रवेश केला होता. पाकिस्तानात प्रवेश करुन भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्प्सना लक्ष्य केलं होतं. भारताच्या हल्ल्यात हे दहशतवादी कॅम्पस् उद्ध्वस्त करण्यात आले. हवाई दलाच्या मिराज 2000 आणि सुखोई एसयू 30 या विमानांनी हा एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात जैशच्या जवळपास 250 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. उरी आणि बालाकोट या दोन्ही हल्ल्यानंतर भारताने दाखवून दिलं होतं की आता पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला आता चोख उत्तर दिलं जाणार आहे.
Surgical Strike : बालाकोट एअर स्ट्राईक करण्याचं कारण काय?
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय लष्करावर हल्ला केला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीर महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. त्यावेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या एका कारने ताफ्यातील एका ट्रकला जोरदार धडक दिली. त्यानंतर स्फोटकांनी भरलेल्या कारचा मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर जगभरातून पाकिस्तानवर टिकेची झोड उठली होती आणि पाकिस्तान दहशतवादाचं केंद्र असल्याचं पुन्हा एकदा जगासमोर आलं होतं. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देणं आवश्यक होते. यासाठीच भारताने बालाकोट एअर स्ट्राईक केला.
Pulwama Attack : 14 फेब्रुवारी 2019 झाला होता पुलवामा हल्ला
पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर हल्ला केला होता. त्यावेळी बसमधून प्रवास करत असलेले 40 CRPF जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या भ्याड हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :