Avani Chaturvedi : परदेशी भूमीवर दिसणार 'नारीशक्ती', पायलट अवनी चतुर्वेदीची गगन भरारी; भारताला मिळणार नवी ओळख
Aerial Wargames 2023 : स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदीसह भारतीय हवाई दलाच्या तीन महिला वैमानिक देशाबाहेर होणाऱ्या एरियल वॉर गेममध्ये (Veer Guardian 2023) भारतीय सैन्य दलाचा भाग असणार आहेत.
![Avani Chaturvedi : परदेशी भूमीवर दिसणार 'नारीशक्ती', पायलट अवनी चतुर्वेदीची गगन भरारी; भारताला मिळणार नवी ओळख veer guardian 2023 first time indian pilot avani chaturvedi taking part in aerial wargames in japan Avani Chaturvedi : परदेशी भूमीवर दिसणार 'नारीशक्ती', पायलट अवनी चतुर्वेदीची गगन भरारी; भारताला मिळणार नवी ओळख](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/d91235255fe24ec896303fe1fda2e3ec1673144655740322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aerial Wargames in Japan : भारतीयांना अभिमानाने मान उंच करायला लावणारी बातमी आहे. भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी (Avani Chaturvedi) नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदीसह भारतीय हवाई दलाच्या तीन महिला वैमानिक देशाबाहेर होणाऱ्या एरियल वॉर गेममध्ये (Aerial Wargames) भारतीय सैन्य दलाचा भाग असणार आहेत. ही ऐतिहासिक कामगिरी करणारी ती भारतातील पहिली महिला पायलट ठरणार आहे. असा पराक्रम करण्याची अवनी चतुर्वेदीची ही पहिलीच वेळ नाही. अवनीने यापूर्वीही अनेक इतिहास रचले आहेत.
अवनी चतुर्वेदी सुखोई लढाऊ विमान उडवणार
भारतीय हवाई दलाच्या इतिहासामध्ये नवं सोनेरी पान लिहिलं जाणार आहे. भारतीय हवाई दलात पहिल्यांदाच स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदी सुखोई (Su-30MKI) लढाऊ विमान उडवणार आहे. परदेशी भूमीवर सुखोई उडवणारी अवनी पहिली महिला वैमानिक ठरणार आहे. हा एक अद्भुत आणि अविस्मरणीय क्षण असेल. परदेशी भूमीवर युद्धसरावासाठी तीन महिला लढाऊ वैमानिकांपैकी अवनीची यासाठी निवड झाली आहे.
परदेशी भूमीवर पहिली भारतीय महिला पायलट
न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार, वीर गार्डियन 2023 हवाई सराव 16 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. हा सराव जपानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ओमिटामा येथील हयाकुरा एअर बेस, त्याच्या आसपासचे हवाई क्षेत्र आणि सायमा येथील इरुमा एअर बेस येथे हा सराव केला जाईल.
In a first, IAF woman fighter pilot to participate in aerial wargames outside country in Japan
— ANI Digital (@ani_digital) January 7, 2023
Read @ANI Story | https://t.co/Ibfb6MHArS#IAF #FighterPilot #AerialWargames #WomanFighter pic.twitter.com/tDO9OnOT5m
भारतीय हवाई दल रविवारी जपानला रवाना होणार
देशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि जपान संयुक्त हवाई सराव 'वीर गार्डियन-2023' आयोजित करणार आहेत. भारतीय हवाई दलाने (IAF) निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल असेल. 12 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत जपानच्या हवाई सेल्फ डिफेन्स फोर्ससोबत वीर गार्डियन 2023 या पहिल्या सरावासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी रविवारी जपानला रवाना होईल. चार Su-30 MKI, दोन C-17 ग्लोबमास्टर्स आणि एक IL-78 टँकर भारतीय हवाई दलासह सहभागी होतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)