एक्स्प्लोर
बालाकोटमध्ये 250 हून अधिक दहशतवादी ठार, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांचा दावा
सरकारकडे आकडा नाही, सैन्याकडेही कोणता आकडा नाही. मग अमित शाहा कुठल्या आधारावर बोलत आहेत, अशी टीका शाहांवर झाली होती. आता त्यांच्या बचावासाठी व्ही. के. सिंह पुढे आलेले दिसत आहेत.

नवी दिल्ली : बालाकोटमधल्या हल्ल्यात अंदाजे 250 हून अधिक दहशतवादी ठार झाले असावेत, असा दावा माजी सैन्यप्रमुख आणि सध्या परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री असलेले व्ही. के. सिंह यांनी व्यक्त केला आहे. रांचीमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बालाकोटमध्ये 250 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला होता. वायूदल प्रमुख बीएस धनोआ यांनीही "वायूसेनेचं काम लक्ष्य भेदणं हे असतं. तिथे किती नुकसान झालं हे आम्ही मोजत नाही" असं वक्तव्य केलं होत. हा फक्त अंदाज आहे, अधिकृत आकडेवारी नाही, असं व्ही. के. सिंह म्हणाले. सरकारकडे आकडा नाही, सैन्याकडेही कोणता आकडा नाही. मग अमित शाहा कुठल्या आधारावर बोलत आहेत, अशी टीका शाहांवर झाली होती. आता त्यांच्या बचावासाठी व्ही. के. सिंह पुढे आलेले दिसत आहेत. 40 जवान शहीद आणि एअर स्ट्राईक 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतीय वायूदलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करुन जैश-ए-मोहम्मदचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते. संबंधित बातम्या
आमचं काम लक्ष्य भेदणं, मृतदेह मोजण्याचं नाही : वायू दल प्रमुख
मसूद अजहर जिंदा है : पाकिस्तानी मीडियाचा दावा
भारताच्या हवाई हल्ल्यात 'जैश'चं मोठं नुकसान, मसूदच्या भावाची कबुली, मात्र पाकिस्तानी लष्कराला अमान्य
भारतीय समजून पाकिस्तानी लोकांनी त्यांच्याच पायलटला मारले
आणखी वाचा























