Controversial Statement on Rahul Gandhi : आसामच्या मुख्यमंत्र्यांचे राहुल गांधीबाबत वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेस आक्रमक
Controversial Statement on Rahul Gandhi : आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी उत्तराखंडमध्ये प्रचार करताना काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Controversial Statement on Rahul Gandhi : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीचा प्रचार करत असताना अनेक नेते मंडळी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी नुकतेच उत्तराखंडमध्ये प्रचार करताना काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. "भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा राहुल गांधी पुरावा मागत होते. परंतु, आम्ही कधी ते कोणत्या वडिलांचे पुत्र आहेत? याचा पुरावा मागितला आहे का? असे वादग्रस्त वक्तव्य करत, सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगितल्यानंतर पुरावा मागण्याचा अधिकार राहुल गांधी यांना कोणी दिला? असा प्रश्न हिमंत सरमा यांनी उपस्थित केला.
उत्तराखंड येथे एका सभेला संबोधित करताना हिमंत सरमा यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, देशाचे पहिले लष्कर प्रमुख बिपीन रावत हे उत्तराखंड आणि देशाचा गौरव होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने पाकिस्तामध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. परंतु, राहुल गांधी यांनी त्याचे पुरावे मागितले. तुम्ही कोणत्या वडिलांचे पुत्र आहात याचा आम्ही कधी पुरावा मागितला का?"
"भारतीय सैन्याला पुरावा मागण्याचा अधिकार यांना कोणी दिला? राहुल गांधी यांना भारतीय लष्कर, बिपीन रावत आणि उत्तराखंडच्या सुपुत्रावर विश्नास नाही का? त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असे सांगितल्यानंतर तुम्हाला पुरावा कशासाठी पाहिजे? असा प्रश्न हिमंत सरमा यांनी यावेळी उपस्थित केला.
"तुम्ही खरोखर राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा मी तुम्हाला कधी मागितला आहे? सैनिकांचा अपमान करू नका. देश ही खूप महत्वाची गोष्ट आहे. लोक देशासाठी जगतात आणि मरतात," अशी टीका हिमंत सरमा यांनी केली.
काँग्रेसकडून पलटवार
दरम्यान, हिमंत सरमा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसनेही पलवटार केला आहे. "समोर दिसत असलेला पराभव पाहून आसामच्या मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी राजकीय दिवाळखोरीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निष्ठा मिळवण्यासाठी जुन्या पक्षावर टीका करणे आवश्यक आहे. हेमंत सरमा यांच्या क्षुद्रपणाचा आणि कुजक्या विचारसरणीचा हा पुरावा आहे, असे ट्विट काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Punjab Elections : मुख्यमंत्री पदासाठी चरणजीत सिंह चन्नी यांना काँग्रेसची पसंती, राहुल गांधी यांची घोषणा
- Arvind Kejriwal on Majha Katta : पंजाबच्या आगामी निवडणूकींच्या सर्व्हेत 'आप'चं पारडं जड का?, केजरीवालांनी स्वत: सांगितलं कारण
- ABP C Voter Survey: काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा कुणाला होणार फायदा? पाहा जनतेचा कौल