Punjab Elections : मुख्यमंत्री पदासाठी चरणजीत सिंह चन्नी यांना काँग्रेसची पसंती, राहुल गांधी यांची घोषणा
काँग्रेस नेते राहुल गांधी हे आगामी निवडणूंकाच्या पार्श्वभूमीवर पंजाब येथील लुधियाणा शहरात प्रचारासाठी आले होते, यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
लुधियाणा : देशात पाच महत्त्वाच्या राज्यातील निवडणूकांची रणधुमाळी सुरु असून पंजाब निवडणूकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण आम आदमी पार्टीने यंदा त्याठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने सर्व्हेही त्यांच्या बाजूने झुकत असल्याने काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. दरम्यान काँग्रेसकडून नवजोत सिंह सिद्धू (Navjot Sidhu) आणि चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Channi) या दोघांपैकी कोणाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करणार हा मोठा प्रश्न होता. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लुधियाणा येथे प्रचारासाठी आले असताना चरणजीत सिंह चन्नी यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.
सर्व्हेतूनही चरणजीत यांचच नाव आलं होतं समोर
पंजाबमध्ये काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी या प्रश्नावर 40 टक्के लोकांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाला पसंती दिली आहे. चन्नी यांच्या नेतृत्वातच पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणूक लढवावी असे लोकांचे म्हणणे आहे. तर 21 टक्के लोकांनी सिद्धू यांच्या नावाला पसंती दिली आहे. सिद्धू यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली पाहिजे असे 21 टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर 27 टक्के लोकांनी दोघांच्याही नावाला नकार दिला आहे. तर 12 टक्के लोकांनी याबाबत माहित नसल्याचे उत्तर दिले आहे.
काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी
सिद्धू - 21 टक्के
दोन्ही नको - 27 टक्के
माहित नाही - 12 टक्के
हे ही वाचा :
- Arvind Kejriwal on Majha Katta : पंजाबच्या आगामी निवडणूकींच्या सर्व्हेत 'आप'चं पारडं जड का?, केजरीवालांनी स्वत: सांगितलं कारण
- ABP C Voter Survey: काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा कुणाला होणार फायदा? पाहा जनतेचा कौल
- Uttar Pradesh Assembly Election 2022: भाजपने मित्रपक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला केला निश्चित, पाहा कोणत्या पक्षाला किती जागा?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha