Mayawati on President Post : मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघू शकते, पण राष्ट्रपतीचे नाही, अखिलेश यादवांना मायावतींचे प्रत्युत्तर
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांच्यावर टीका केली होती. त्यावर मायावतींनी प्रत्युत्तर दिले आहे.
![Mayawati on President Post : मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघू शकते, पण राष्ट्रपतीचे नाही, अखिलेश यादवांना मायावतींचे प्रत्युत्तर Uttar Pradesh Mayawati hit back on Akhilesh yadav said not president i can dream of becoming pm in future Mayawati on President Post : मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघू शकते, पण राष्ट्रपतीचे नाही, अखिलेश यादवांना मायावतींचे प्रत्युत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/28/d745c4c8b15eba1cbedd9d4e8ec4de11_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mayawati on President Post: मी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री किंवा पुढील पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकते. परंतू राष्ट्रपती होण्याची माझी कधीच इच्छा राहणार नसल्याचे वक्तव्य उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी केले आहे. त्यामुळे मायावतींची पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा असल्याचे त्यांच्या या वक्त्व्यावरुन दिसत आहे. दरम्यान, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या वक्तव्यावर मायावती यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हमाले होते अखिलेश यादव
अखिलेश यादव यांनी मायावती यांच्यावर जोरदार टीका केली होती. विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने आपली मते भाजपला दिली होती, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला होता. तसेच आता भाजप मायावतींना राष्ट्रपती बनवते का नाही ते पाहावे लागेल, असा टोला अखिलेश यादव यांनी मायावतींना लगावला होता.
भाजपच्या विजयाला समाजवादी पार्टीच जबाबदार : मायावती
मी पुन्हा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकते. राष्ट्रपती होण्याचे स्वप्न मी कधीच पाहणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयासाठी समाजवादी पक्ष (एसपी) जबाबदारच असल्याचे मायावतींनी म्हटले आहे. मला राष्ट्रपती बनवून समाजवादी पार्टीला माझी जागा मोकळी करायची आहे. मी मला राष्ट्रपती करुन त्यांना यूपीच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करायचा असल्याचे मायावती म्हणाल्या. तसेच बसपा आपल्या प्रभावाखाली येणार नाही हे आता समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना कळून चुकले असल्याचे मायावती म्हणाल्या.
मुस्लिम, दलितांच्या मतांमध्ये खूप ताकद आहे : मायावती
मुस्लिम आणि दलितांच्या मतांमध्ये खूप ताकद आहे. जर हे लोक जर एकत्र आले तर ते मला मुख्यमंत्री बनवू शकतात. राज्यातील मुस्लिम समाजवादी पक्षावर प्रचंड नाराज आहेत. अशा परिस्थितीत ते त्यांच्यासोबत जात नाहीत. यूपीतील मुस्लिम आणि यादवांनीही आपली मते समाजवादी पार्टीला देऊन बघितले आहे. तसेच अनेक पक्षांशी युती करुनही सपाला सरकार बनवता आले नाही, त्यामुळे आता पुन्हा हेच लोक बसपाचे सरकार बनवतील असा विश्वास, मायावतींनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)