एक्स्प्लोर
कुख्यात डॉन मुन्ना बजरंगीची जेलमध्ये गोळ्या झाडून हत्या
महत्त्वाचं म्हणजे मुन्ना बजरंगीची पत्नी सीमा सिंहने 29 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन जेलमध्ये त्याची हत्या होऊ शकते अशी भीती व्यक्त केली होती.

बागपत : उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात अंडरवर्ल्ड डॉन प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जेल प्रशासनापासून लखनौच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. आज (9 जुलै) सकाळी पहाटे साडेपाच वाजता जेल उघडल्यानंतर ही घटना घडली. रंगदारीशी संबंधित एका खटल्याच्या निमित्ताने मुन्ना बजरंगीची आज बागपत कोर्टात हजर राहणार होता. महत्त्वाचं म्हणजे मुन्ना बजरंगीची पत्नी सीमा सिंहने 29 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन जेलमध्ये त्याची हत्या होऊ शकते अशी भीती व्यक्त केली होती. सुनील राठी गँगचा हात मुन्ना बजरंगीच्या हत्येमागे पश्चिम यूपी आणि उत्तराखंडमध्ये सक्रिय असलेल्या सुनील राठी गँगचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. सुनील राठी गँगच्या शूटर्सनी मुन्ना बजरंगीला गोळी मारल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं असून पुढील तपासातच याला दुजोरा मिळेल, असं अतिरिक्त पोलिस महासंचालक चंद्र प्रकाश यांनी सांगितलं. रविवारी बागपत जेलमध्ये शिफ्ट मुन्ना बजरंगीला रविवारी रात्रीच झाशी जेलमधून बागपत जेलमध्ये हलवलं होतं. बागपतमध्ये रविवारी रेल्वेशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी होती. त्यामुळे रविवारी रात्री 9 वाजताच मुन्ना बजरंगीला बागपत जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. पूर्वांचलच्या मोठ्या गुन्हेगारांमध्ये गणना मुन्ना बजरंगीची गणना पूर्वांचल कुख्यात गुन्हेगारांमध्ये होते. अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्ये बजरंगीचा समावेश आहे. त्याचा जन्म 1967 मध्ये उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील पूरेदयाल गावात झाला होता. बजरंगीने पाचवी इयत्तेतच शाळा सोडून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं. चार जण निलंबित, न्यायालयीन चौकशीचे आदेश जेलमध्ये मुन्ना बजरंगीच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जेलमध्ये हत्या झाल्याने प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहे. याप्रकरणी चार जणांना निलंबित करण्यात आलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























