एक्स्प्लोर

धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक,व्हॉट्सअप ग्रुप द्वारे करत होता धर्मांतरण

उत्तर प्रदेशमध्ये 20 जून रोजी अवैधरित्या धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याचा तपास उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरु आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये सध्या धर्मांतराचा विषय चर्चेत असतानाच आता उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणात आणखीन एक अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव धीरज जगताप असून तो महाराष्ट्राच्या यवतमाळमधील राहणार आहे. धीरज जगतापला दहशतवादी विरोधी पथकाने उत्तर प्रदेशच्या कानपूर मधून अटक केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 20 जून रोजी अवैधरित्या धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याचा तपास उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरु झाला. या प्रकरणात देशभरातून 14 लोकांना अटक करण्यात आली.

मौलाना उमर गौतम, मौलाना कलीम सिद्दिकी सोबत महाराष्ट्र नेटवर्कच्या रामेश्वर कावडे उर्फ आदम उर्फ एडम भुप्रिया बंदो उर्फ अरसलान मुस्तफा आणि कौशर आलम या प्रमुख आरोपींना उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली.

उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचं नाशिक कनेक्शन, कथित डॉक्टरला यूपी एटीएसकडून अटक

तपास सुरु असतानाच धीरज जगतापच नाव उत्तरप्रदेश दहशतवादी पथकाच्या रडारवर आलं. धीरज जगताप ने दहा वर्षांपूर्वी धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि तो तेव्हापासूनच अवैधरित्या धर्मांतरण करण्याच्या  कार्यात सामील होता. गेल्या अनेक वर्षांपासून धीरज जगताप हा प्रसाद कांवरे, कौसर आलम आणि अर्सलान यांच्या संपर्कात होता.

अवैधरित्या धर्मांतरण करण्यासाठी धीरजकडून व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात आले होते. ज्यांची नावं REVERT,REHAB आणि DAWAH अशी होती. या व्हॉट्सअप ग्रुप द्वारे इतर धर्माबद्दल द्वेष पसरवणे, खोटी आश्वासने देऊन आणि प्रलोभने देऊन लोकांना इस्लाम धर्म कबूल करण्यास भाग पाडण्याच काम धीरज आणि इतर आरोपींकडून केला जात होतं. तसेच कट्टरपंथी संदेश सुद्धा त्या व्हॉट्सअप ग्रुप वर पाठवले जात असल्याची माहिती उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाला मिळाली.

धीरज आणि इतर आरोपी मिळून अवैधरित्या धर्मांतराचा रॅकेट देशभरात चालवत होते. धीरज सुद्धा या रॅकेटचा एक महत्त्वाचा सदस्य होता. लोकांना मदत करण्याचा आश्वासन देऊन, त्यांना इतर गोष्टींचा आमिष दाखवून त्यांचे धर्मांतरण केलं जात होत. प्रकाश कावरे हा धर्मांतर करण्यासाठी कायदेशीर बाबींच्या गोष्टींची पूर्तता करायचा. इतकंच नाही तर धीरज जगतापने काहींना नोकरीचं आमिष दाखवून त्यांच धर्मांतर केल्याचे तपासात निष्पन्न झाल.

उत्तर प्रदेशचे वरिष्ठ आयएएस अधिकारी यांचं सुद्धा काही दिवसांपूर्वी त्यांच्या सरकारी निवासस्थानी धर्मांतरण सुरु असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची चौकशी उत्तर प्रदेश सरकारकडून केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात या प्रकरणात अजून कुठं कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget