ABP Majha Impact : 'एबीपी माझा'च्या ऑपरेशन लुटारुची शेलार आणि फडणवीसांकडून दखल! स्टिंगमधून मोठा आर्थिक घोटाळा उघड
एबीपी माझाने क्लिन अप मार्शलचा पर्दाफाश केल्यानंतर आशिष शेलारने या प्रकरणाची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : एबीपी माझाच्या ऑपरेशन लुटारुनंतर आता भाजप नेता आशिष शेलार यांनी मोठा आरोप केला आहे. आशिष शेलार यांनी 'एबीपी माझा'चं अभिनंदन करत क्लिनअप मार्शलच्या माध्यमातून एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. एबीपी माझाने क्लिन अप मार्शलचा पर्दाफाश केल्यानंतर आशिष शेलारने या प्रकरणाची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे. आशिष शेलार यांनी आरोप केला की, क्लिन अप मार्शल फक्त कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची पहिली पायरी आहे. हा पैसा कोणा कोणापर्यंत पोहचतो याची चौकशी झाली पाहिजे आणि यावर श्वेतपत्रिका काढण्याची त्यांनी मागणी केली आहे.
तसेच एबीपी माझाच्या स्टिंगमध्ये देखील महिला क्लिनअप मार्शलने कबुली दिली होती की, दर दिवस त्यांची पाचशे रुपयापर्यंत वरची कमाई होती. 'एबीपी माझा' ने ही पवई परिसरात क्लिन अप मार्शलकडून वसूल केले गेले. पैसे काही अनओळखी लोकांसोबत घेऊन जाताना पाहिले. आमच्या कॅमेरात कैदी झालेला दृश्यही बोलती आहेत. ही लोक महानगरपालिका कर्मचारी नक्कीच नव्हेत. मग लोकांकडून घेतलेले पैसे आपल्यासोबत नेणारी ही लोकं कोण? एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पैसे फक्त क्लिन अप मार्शल आणि कॉनट्रॅक्टर पर्यंतच नाही तर वरपर्यंत जात आहेत. आता पर्यंत महानगरपालिकाने 71. 5 कोटी रुपये दंड मास्क न घालणाऱ्यांकडून घेतले आहेत.
मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत एकून 3000 क्लिनअप मार्शल आहेत. जसं एक महिला क्लिन अप मार्शलने कबुली दिली की दररोज ते 500 रुपये वरचे कमवतात. तर दर रोज 3000 X 500 होतात 15 लाख रुपये होतात. 15 लाखाला जर 30 दिवसांनी गुणिले केले तर दर महिन्याला 45 लाख रुपये बेकायदेशीरपणे कमवले जातात. जर मागील 15 महिन्यांचा हिशोब केला तर 45 लाख गुणिले 15 महिने होतात 67.5 कोटी रुपये आहे.
यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘एबीपी माझा' ने जे स्टिंग ऑपरेशन केलंय ते अतिशय धक्कादायक आहे. ज्यांना आपण सुरक्षेच्या दृष्टीने ठेवलय, ज्यांच्याकडून अपेक्षा आहे की, कोरोना काळातील नियम पाळले गेले पाहिजे. तीच मंडळी वसुली करत असतील तर हे योग्य नाही.
त्यात सर्वात महत्त्वाचे हे आहे की, बीएमसीमध्ये अशा प्रकारे विविध खात्यांमध्ये आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशा पद्धतीने काम सुरू आहे. अनिर्बंध कारभार आहे, असा कारभार थांबवणे गरजेचे आहे. कारण हा मुंबईकरांचा पैसा आहे आणि तो पैसा अशा पद्धतीने लुटलं जाणं योग्य नाही.
तर मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी एबीपी माझा ला आश्वासन दिलं की, "मुंबईकरांची लूट करणाऱ्या क्लिन अप मार्शल्सवर कठोर कारवाई करणार, तसेच एबीपी माझाने क्लिनप मार्शलच्या अवैध वसुलीचा पर्दाफाश केल्यानंतर राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी जे असे मार्शल असतील त्यांना पदावरून हटवून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणजे या क्लिन अप मार्शलने मुंबईकरांकडून सर्वसामान्य लोकांकडून वसुली करुन कोट्यावधीचा घोटाळा केला आहे का? असा सवाल निश्चित उपस्थित होतो. ज्याच उत्तर महानगरपालिका प्रशासनाला द्यावा लागेल आणि याची चौकशी देखील करावी लागेल.