एक्स्प्लोर
उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना : मृतांची संख्या 23 वर, तर 80 हून अधिक जखमी
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. पुरी हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले आहेत.
![उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना : मृतांची संख्या 23 वर, तर 80 हून अधिक जखमी Utkal Express Derails Near Khatauli In Muzaffarnagar Latest Updates उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना : मृतांची संख्या 23 वर, तर 80 हून अधिक जखमी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/19183003/DHl_t-5UAAAXIBP.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरल्यानं मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 23 जणांचा मृत्यू, तर 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
खतौलीजवळ हा अपघात झाला असून, रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. अपघाताचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अपघातामागे दहशतवाद्यांचा हात आहे का याचा तपास करण्यासाठी एटीएसटी टीमही दाखल झाली आहे. पण रेल्वेच्या निष्काळीजपणामुळे अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.
पुरीवरुन हरिद्वारला जाणाऱ्या उत्कल एक्स्प्रेससोबत ही दुर्घटना घडली आहे. अपघात इतका भीषण आहे की एक्स्प्रेसचे दोन डबे एकमेकांवर चढले. संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली. सध्या पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख 50 हजारांची मदत दिली जाणार आहे, गंभीर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे, तर किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
https://twitter.com/sureshpprabhu/status/898897484927221760
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आपण स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं ट्विट केलं आहे. तसंच अधिकाऱ्यांना मदतकार्यासाठी सर्व त्या सूचना देण्यात आल्याचं म्हटलं आहे.
https://twitter.com/ANINewsUP/status/898891344382275585
![DHl_t6vUAAEoQUE](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/19183005/DHl_t6vUAAEoQUE-580x395.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)