(Source: ECI/ABP News/ABP Majha)
S Jaishankar on Joe Biden Remark : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन यांनी भारतासाठी वापरला भलताच शब्द; आता मोदी सरकारचा पलटवार!
बिडेन यांनी भारत आणि जपान यांना 'जेनोफोबिक' देश म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, भारतीय समाज नेहमीच इतर समाजातील लोकांसाठी खुला आहे.
S Jaishankar on Joe Biden Remark : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बिडेन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बिडेन यांनी भारत आणि जपान यांना 'जेनोफोबिक' देश म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, भारतीय समाज नेहमीच इतर समाजातील लोकांसाठी खुला आहे. जयशंकर म्हणाले की केंद्र सरकारचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) संकटात सापडलेल्या लोकांसाठी दरवाजे उघडतो. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताची तुलना रशिया आणि चीनसारख्या देशांशी करताना जेनोफोबिक' देश असल्याचा उल्लेख केला. 'जेनोफोबिक' म्हणजे असे देश ज्यांना त्यांच्या देशात स्थलांतरित अजिबात नको असतात किंवा त्यांच्या विरोधात भीतीचे वातावरण निर्माण केले जाते.
सीएएवर जो बिडेन काय म्हणाले?
एका कार्यक्रमात आशियाई-अमेरिकन लोकांशी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले होते की आम्ही स्थलांतरितांचे स्वागत करतो. आश्चर्य वाटते की चीन आर्थिकदृष्ट्या इतका वाईट का अडकला आहे? जपानला समस्या का येत आहेत? रशिया अडचणीत का आहे? भारतासमोर समस्या का आहेत? कारण ते 'जेनोफोबिक' आहेत. त्यांना स्थलांतरित नको आहेत.
जयशंकर यांची सीएएला विरोध करणाऱ्यांवर नाराजी
जयशंकर यांनी भारताच्या नवीन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा संदर्भ देताना सांगितले की, भारत लोकांचे स्वागत कसे करत आहे. ते म्हणाले की याच कारणामुळे भारतात सीएए कायदा आहे जो संकटात सापडलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे काम करतो. एस जयशंकर म्हणाले की, 'ज्यांना येण्याची गरज आहे आणि ज्यांना येण्याचा अधिकार आहे त्यांच्या स्वागतासाठी आपण तयार असले पाहिजे.' जयशंकर यांनी सीएएला विरोध करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, असे लोक आहेत ज्यांनी जाहीरपणे सांगितले की CAA मुळे10 लाख मुस्लिम भारतातील नागरिकत्व गमावतील.
पाश्चात्य मीडियाचा एक भाग भारताला लक्ष्य करतो
एस जयशंकर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, या दाव्यांनंतरही भारतात कोणीही त्यांचे नागरिकत्व गमावलेले नाही. ते म्हणाले की पाश्चिमात्य माध्यमांचा एक भाग जागतिक नॅरेटिव्ह स्वतःच्या पद्धतीने चालवू इच्छित आहे आणि या क्रमाने ते भारताला लक्ष्य करतात. ते म्हणाले की हे अशा लोकांनी त्यांच्या नॅरेटिव्हवर नियंत्रण ठेवावे.
इतर महत्वाच्या बातम्या