एक्स्प्लोर
यूपीएससी टॉपर टिना दाबीचं मराठमोळं कनेक्शन
नवी दिल्ली : बुद्धीचा कस पाहणाऱ्या परीक्षांमधली एक परीक्षा म्हणजे यूपीएससी. नुकताच युपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानंतर देशात एकाच नावाची चर्चा सुरु झाली ती म्हणजे टिना दाबी. टीनाने यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला. तिने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी हे यश संपादन केलं आहे.
टिनाच्या या यशामागे मराठमोळा हात आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं टीनाचं मराठी नातं आहे. कारण टिनाच्या या यशात महत्वाची भूमिका आहे, ती तिच्या आईची. टीनाच्या आई हिमाली कांबळे या महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील पुलगावच्या आहेत.
हिमाली कांबळे आणि टिना दाबी यांनी 'माझा'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या महाराष्ट्राविषयी असलेल्या नात्याबद्दल रंजक गोष्टी सांगितल्या.
महाराष्ट्र जन्मभूमी, कर्मभूमी
टिनाच्या आईचं कुटुंब पुलगावमध्ये राहत होतं. हिमाली यांचे आजोबा स्टेशन मास्तर होते. पण त्यांच्या निधनानंतर हिमाली यांचं कुटुंब नागपूरला शिफ्ट झालं. मध्यमवर्गीय कुटुंबात हिमाली यांचा जन्म झाला. कुटुंबाची जबाबदारी हिमाली यांच्या आईवर असायची. हिमाली यांनी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं. हिमाली याचं शिक्षण नागपूर आणि मध्य प्रदेशात झालं. अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन त्यांनी सरकारी खात्यात नोकरी देखील केली, असं हिमाली यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी प्रेम
हिमाली यांचं कुटुंब आजही अनेकदा महाराष्ट्रामध्ये येतं. शिर्डी, नाशिक ही टिनाची आवडती ठिकाणं आहेत. हिमाली यांनी महाराष्ट्र सोडलं तरी महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थांची, सण-उत्सवांची परंपरा अभिमानाने जोपासली आहे. महाराष्ट्राचा पुरण-पोळी हा पदार्थ प्रत्येक सणाला हिमाली यांच्या घरात बनतो, असं हिमाली यांनी सांगितलं.
आईकडून मिळाली प्रेरणा
टिनाने अभ्यासात कठोर मेहनत तर घेतलीच, पण या मेहनतीला जोड होती ती हिमाली यांच्या प्रेरणेची. हिमाली यांनी नेहमी वेळ काढून टिनाला साथ दिली. अभ्यासात मन लागेल असं वातावरण तयार केलं. त्यामुळेच हे यश मिळू शकलं, असं टिना सांगते.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement