UPSC Exams Tips: यूपीएससी परीक्षेची तयारी करताय? हिमांशू गुप्ता यांच्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स
UPSC Exams Tips: यूपीएससीची परीक्षा उतीर्ण होण्यासाठी हिमांशु यांनी कोणताही क्लास लावला नाही.
UPSC Exams Tips: यूपीएससी परीक्षा 2020 मध्ये (UPSC Exams) संपूर्ण भारतातून 139 गुण मिळणारे हिमांशु गुप्ता (Himanshu Gupta) यांच्याबाबत काही महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. उत्तर प्रेदशच्या (Uttar Pradesh) बरेली (Bareilly) जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या हिमांशु यांनी 3 वेळा यूपीएससी परीक्षा उतीर्ण केलीय. यूपीएससीची परीक्षा उतीर्ण होण्यासाठी हिमांशु यांनी कोणताही क्लास लावला नाही. त्यांनी डिजिटल माध्यमांतून परीक्षा उतीर्ण केलीय. दरम्यान, हिमांशु यांनी यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही खास टिप्स दिल्या आहेत.
हिमांशू गुप्ता एका साध्या कुटुंबातील असून त्याचे वडील दुकानदार आहेत. हिमांशूला वर्तमानपत्र वाचण्याची आवड होती. ते दुकानात जाऊन दररोज वर्तमानपत्र वाचायचे. त्याच्यात हळूहळू यूपीएससीबद्दल कुतूहल निर्माण झालं. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचं ठरवलं. त्यांनी सुरुवातीला एनसीईआरटीची पुस्तकं वाचली. त्यानंतर एनसीईआरटीची पुस्तके वाचा आणि त्यानंतर स्टॅन्डर्ड पुस्तकातून तयारी केलीय. त्यांनी कुठलेही कोचिंग न घेता छोट्या ठिकाणी राहून मेहनत घेतली.
हिमांशूनं 3 वेळा यूपीएससीची परीक्षा उतीर्ण केली-
हिमांशु यांनी 2018 मध्ये यूपीएससीची परीक्षा उतीर्ण केली आणि भारतीय रेल्वे सेवा मिळवली. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी भारतीय पोलीस सेवा मिळवली. अखेर 2020 मध्ये तिसऱ्यांदा उतीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवा मिळवली. हिमांशूनं स्वत: मेहनत करून यश संपादन केलं. त्यांनी डिजिटल माध्यमातून मॉक टेस्ट दिल्या. तसेच इंटरनेटवर काही महत्वाच्या गोष्टी आढळल्यास त्यांची हार्ड कॉपी काढून त्यांनी अभ्यास केलाय.
हिमांशू यांच्याकडून विद्यार्थ्यांना सल्ला-
शहरात किंवा गावात राहून तयारी यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारी करू शकता, त्यासाठी दिल्लीत येण्याची गरज नाही. घरात बसून इंटरनेटच्या मदतीने चांगली रणनीती बनवा आणि तयारीसाठी स्वत:ला मजबूत करा. स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता, असा सल्ला हिमांशू यांनी विद्यार्थ्यांना दिलाय.
हे देखील वाचा-