![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
New Navy Chief: व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार नौदलाचे नवे प्रमुख, 30 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार
New Navy Chief : व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार हे नौदलाचे नवे प्रमुख असणार आहेत. सध्या ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत.
![New Navy Chief: व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार नौदलाचे नवे प्रमुख, 30 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार Vice Admiral R Hari Kumar to be next Chief of Naval Staff Defence Ministry Indian Navy New Navy Chief: व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार नौदलाचे नवे प्रमुख, 30 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/09/fbb79ce195c9e2fd29c96f3abb5c1d52_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या नव्या प्रमुखांच्या नावाची घोषणा झाली आहे. व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार हे आता नौदलाचे प्रमुख असतील. नौदलाचे सध्याचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह 30 नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्याच दिवशी व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार हे नौदलाच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार यांचा जन्म 12 एप्रिल 1962 रोजी केरळमधील त्रिवेंद्रम या ठिकाणी झाला. त्यांनी आतापर्यंत व्हॉईस ऑफ डिफेन्स स्टाप, चीफ ऑफ पर्सनल, द फ्लॅग ऑफिसर कमांडिंग वेस्टर्न फ्लीट या पदांवर काम केलं आहे. तसेच नेव्हल वॉर कॉलेज गोवाच्या कमांडंट पदाची जबाबदारीही त्यांनी पेलली आहे. सेशेल्स सरकारचे नेव्हल सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आहे.
Vice Admiral R Hari Kumar to be next Chief of Naval Staff: Defence Ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 9, 2021
मुंबई विद्यापीठातून त्यांनी डिफेन्स अन्ड स्ट्रॅटेजिक स्टडिज या विषयातून त्यांनी एमफिल केलं आहे. त्यांनी त्रिवेंद्रमच्या गव्हर्नमेन्ट आर्ट्स कॉलेजमधून प्रि डीग्री कोर्स पूर्ण केला.
व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केलं आहे. आयएनएस रंजित या युध्दनौकेवर त्यांना तोफखाना प्रमुख या पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. तसेच आयएनएस विराट या युद्धनौकेवरही त्यांनी आपली सेवा बजावली आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)