एक्स्प्लोर
अजगराचा खेळ जीवावर, गारुड्याचा गळा आवळला!
हा प्रकार घडला तेव्हा अनेकांना हा खेळातलाच एक भाग आहे असं वाटलं, त्यामुळे तिथे उपस्थितांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यातही शूट केला.
उत्तर प्रदेश : गारुडीचा खेळ एका गारुड्याला महागात पडला. अजगराचा खेळ दाखवताना, त्याने अचानक गारुड्याचा गळा आवळला आणि बघता-बघता गारुडी जमिनीवर कोसळला. उत्तर प्रदेशातील मऊ जनपदच्या मुहम्मदाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
रस्त्याच्या कडेला हा गारुडी अजगराचा खेळ दाखवत होता. गारुडीच्या खेळ पाहून ये-जा करणाऱ्यांनी तिथे गर्दी केली. यावेळी अजगराने गारुड्याचा गळ्याला वेढा घातला. गारुड्याला अजगराला सोडवताच आलं नाही आणि काही वेळाने तो तिथेच पडला.
हा प्रकार घडला तेव्हा अनेकांना हा खेळातलाच एक भाग आहे असं वाटलं, त्यामुळे तिथे उपस्थितांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यातही शूट केला.
अजगराने पुन्हा त्याच्या गळ्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला असता, गर्दीमधील एका व्यक्तीला गारुडी बेशुद्ध तर पडला नाही ना अशी शंका आली. त्याने पाणी आणून गारुड्यावर शिंपडलं, तरीही त्याला शुद्ध आली नाही. त्याची शुद्ध हरपल्याचं लक्षात येताच, गर्दीमधील काहींनी त्याला प्रथमोचार केंद्रात दाखल केलं.
गारुड्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी वाराणसीमध्ये पाठवलं.
दरम्यान, या गारुड्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement