एक्स्प्लोर

Hathras Stampede : सत्संगामधील चेंगराचेंगरीत 116 जणांनी जीव गमावला, हाथरसची दुर्घटना घडल्यानंतर प्रवचन देणारा भोले बाबा फरार

UP Hathras Stampede : हाथरसमधील चेंगराचेंगरीत लहान मुलं, महिला, पुरुष आणि अनेक वृद्धांचाही यात बळी गेलाय. आणि या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोलेबाबा आता फरार झाला आहे.

UP Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या महाभंकर घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला. भोलेबाबा नावाच्या महाराजाच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविकांचा बळी गेला आहे. लहान मुलं, महिला, पुरुष आणि अनेक वृद्धांचाही यात बळी गेलाय आणि या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोलेबाबा आता फरार झाला आहे. 

सत्संगामधील चेंगराचेंगरीत 116 जणांनी जीव गमावला

लहान मुलं आणि वृद्धांचाही चेंगरून काही क्षणात मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे. इथं भोलेबाबाचा सत्संग सुरू होता. या सत्संगाला 50 हजाराहून जास्त भाविक आले होते. सत्संग संपल्यानंतर घरी जाताना झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 116 भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जातेय. सत्संग संपल्या संपल्या बाहेर पडण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. बाहेर जाण्याच्या वाटेत दुचाकी पार्क केल्या होत्या, त्यामुळे अडथळे वाढले. या सगळ्या गोंधळात लोक एकमेकांवर पडत गेले आणि अनेक भाविकांचा गुदमरून मृत्यू झाला.

हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?

सिकंदराराऊच्या फुलरई गावात भोलेबाबांचा सत्संग सुरु होता. सत्संगसाठी प्रचंड गर्दी जमली होती. या सत्संगामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक होती. सत्संग संपल्यावर बाहेर पडण्यासाठी रेटारेटी झाली. पुढे जाण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर पडू लागले, भाविक चिरडले गेल्यानं मृतदेहांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं.

ज्याच्या सत्संगानंतर ही भयंकर दुर्घटना घडली, तो भोलेबाबा नेमका कोण आहे, ते जाणून घ्या.

कोण आहे भोले बाबा?

  • भोले बाबाचं खरं नाव सूरज पाल
  • भोले बाबानं 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातली नोकरी सोडून सत्संग सुरू केला
  • सत्संग सुरू केलेल्यानंतर तो साकार विश्व हरी भोले बाबा बनला
  • भोले बाबाचे उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशात मोठ्या संख्येनं अनुयायी
  • भोले बाबासोबत त्याची पत्नीही प्रवचन देते
  • कोरोनाच्या काळात भोले बाबाचा सत्संग वादात सापडला
  • हाथरसची दुर्घटना घडल्यानंतर भोले बाबा फरार

या दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेलाय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

भोले बाबांच्या भक्तांवर काळाचा घाला, हाथरसच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू; चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget